माढा मतदारसंघातील जनतेचा एकच एल्गार; रणजीत बबनराव शिंदे निश्चित आमदार
अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्या टेंभुर्णीतील प्रचार सभेला 35 ते 40 हजारांची अलोट गर्दी
माढा (बारामती झटका)
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील हजारों मतदारांच्या टेंभुर्णी येथील भव्य विराट महाविजयी संकल्प मेळाव्यात किमान 35 ते 40 हजार जनतेने आवाजी स्वराने जोरजोरात घोषणा दिल्या दिली की, माढा मतदारसंघातील मतदारांचा एकच एल्गार; रणजीत बबनराव शिंदे निश्चित आमदार होणार, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या विराट मेळाव्यास आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार विनायकराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, वामनराव माने, समाधान काळे, युवराज पाटील, गणेश पाटील, रायपा हलवणकर, प्रणव परिचारक, अशोक लुणावत, सुहास पाटील, आरपीआयचे बापूसाहेब जगताप, युवराज घाटे, समीर मुलाणी, वामनभाऊ उबाळे, संजय पाटील-भिमानगरकर, शिवाजी कांबळे, शिवाजीराव पाटील, बंडूनाना ढवळे, सुधाकर कवडे, नागेश बोबडे, शब्बीर जागीरदार प्रा. सुहास पाटील, दिलीप घाडगे, विक्रमसिंह शिंदे, प्रशांत गिड्डे, सुनंदाताई शिंदे, प्रणिता शिंदे, चित्राताई वाघ यांच्यासह तिन्ही तालुक्यातील अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आ. बबनराव शिंदे म्हणाले की, माढा मतदारसंघाचा मागील 30 वर्षात विकासकामे करताना मोहिते पाटलांचे अतिक्रमण कधीच चालू दिले नाही. यासाठी मी व शिवाजी सावंत सर व इतर मान्यवर पूर्वीही एकत्र आलो होतो. आता तर पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल, पांडुरंग परिवार, काळे गट व इतर सर्वजण आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत. मी कटुतेचे राजकारण कधी केले नाही. 1999 साली मी पहिल्यांदा आदरणीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडला. त्यांना आदरणीय मानून राजकीय व सामाजिक जीवनात वाटचाल केली आहे. यापुढे भविष्यात रणजीत शिंदे यांना तुमच्या ओटीत टाकतो, तोही धडाडीने व सर्वांच्या सहकार्याने विकासाचा रथ पुढे चालू ठेवील, यात कसलीही शंका नसावी. या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, 20 तारखेला सफरचंदा पुढील बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान काळजीपूर्वक करा.
खोटे व लबाड आरोप करणाऱ्यांना आता सडेतोड उत्तर देणार – रणजीत शिंदे
याप्रसंगी अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे अतिशय परखड शब्दात म्हणाले की, खोट्या आणि लबाड गोष्टी अनेक वेळा सांगितल्या की त्या जनतेला खरे वाटू लागतात म्हणून मला आज बोलावेच लागले. आताच्या विरोधी उमेदवाराने साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्यासाठी 357 कोटी कर्ज उचलले पण कामगार व्यापारी तोडणी वाहतूकदार यांचे पैसे दिले नाहीत. ऊस दराच्या बाबतीत तो खोटं बोलतो उलट त्याच्यापेक्षा आम्ही जास्त तर दिला आहे. ऊस दराबाबत तो मोहिते पाटलांच्या पुढे काही बोलत नाही कारण त्यांनी 2600 रुपये प्रति टनच्या पुढे ऊस दर दिलाच नाही, हे सर्वांना माहीत आहे. हा विरोधी उमेदवार सोशल मीडियातून खूप मोठ्याने लबाड बोलून खोटा प्रचार करतो परंतु, याला वीस तारखेला मतपेटीतून असा ‘हाबडा’ द्यायचा आहे की पुन्हा हा आपला नाद करायचा नाही.
मोहिते पाटलांबद्दलही रणजीत शिंदे म्हणाले की, यांनी माढा तालुक्यातील आढेगावच्या शिवरत्न व करकंबच्या विजय शुगर कारखान्याचे शेअरसहित शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि अधिकाऱ्यांचे 50 ते 60 कोटी रुपये बुडविले. आम्हाला हे आता गद्दार म्हणतात पण ह्यांनी भाजप सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले ही गद्दारी नाही का ? मी आजपर्यंत आदरणीय बबनदादाचा मान ठेवून स्पष्ट बोलत नव्हतो. पण, याच मंडळींनी मला बोलायला भाग पाडले. यापूर्वी देखील मोहिते पाटलांनीच जिल्ह्याच्या विकासात अनेक अडथळे निर्माण केले. बबनदादांची मंत्री पदाबाबत बोलणा-यांनी मंत्रिपद भोगून जिल्ह्याचा विकास आडविला, मोठा स्वार्थ साधला. स्वतःच्या तालुक्यात एकही एमआयडीसी नाही, निम्मा तालुका पाण्यावाचून कोरडा ठेवला. सध्या हे खासदार झालेत म्हणजे ‘पाऊस सुरू झाला आणि त्यात रेडा धुवून निघाला’ अशी अवस्था झालेली आहे’. आदरणीय पवार साहेबांच्याकडे पाहून व भाजपच्या कारभाराला कंटाळलेले आणि मनोजदादा जरांगे-पाटील यांच्या विरुद्ध वागणाऱ्यांना धडा शिकवायचा म्हणून जनतेने पवार साहेबांकडे पाहून मते दिली पण ह्यांना वाटलं आम्हालाच मते मिळाली. सध्या गुरु आणि शिष्य दोघेही लबाड आहेत, दहशत निर्माण करणे आणि खोटा प्रभाव पाडणे व बाप जनतेच्या कर्तृत्वाचे गोडवे गाणे याला जनता यापुढे कधीच भीक घालणार नाही आणि अशा पुढार्यांना हद्दपार केल्याशिवाय ही जनता यापुढे राहणार नाही.
पुढे रणजीत शिंदे यांनी सिना-माढा उपसासिंचन योजनेच्या प्रगतीची कामे, खैराव-मानेगाव उपसासिंचन योजना कार्यान्वित करणे, सीना व भीमा नदीवर ठीकठिकाणी मोठे बॅरेजेस बांधणे, मोडनिंब एमआयडीसी कार्यान्वित करणे, वीज, पाणंद रस्ते, आरोग्य सुविधा व या मतदारसंघात राहिलेल्या अनेक मूलभूत सुविधाबद्दल सविस्तर खुलासे केले व अपूर्ण राहिलेली कामे भविष्यकाळात निश्चित पूर्ण केली जातील. तसेच उसाच्या बाबतीत कुठलेही राजकारण केले न जाणार नाही व दहा दिवसाला ऊस बिल खात्यावर जमा केले जाईल, तसेच उसाचा वजन काटा कुठल्याही काट्यावर करून आणा ते स्वीकारले जाईल पण यापुढे कसलेही खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शेतकरी संघटना व मागासवर्गीय मंडळांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. पंढरपूर, माळशिरस आणि माढा तालुक्यातील अनेक मान्यवरांनी याप्रसंगी आपले परखड विचार व्यक्त करून समोरचा उमेदवार कसा तोतया, नटवरलाल व फसवा आहे आणि त्याला तिकीट मिळवून देणारे त्याचे गुरु देखील कशा प्रकारे जनतेशी आजपर्यंत वागत आले आहेत, याचा खुसखुशीत शब्दात समाचार घेतला. वीस तारखेला सफरचंदापुढील बटन दाबून रणजीत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आव्हान केले.
या संकल्प मेळाव्यास पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यातील हजारों नागरिक, मोटरसायकल रॅली, जीप व गाड्यांची रॅली, घोषणा आणि जयजयकार देत व झेंडे फडकवीत उपस्थित होते. या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद व गर्दी जमली होती.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
great articlesitus slot Terpercaya