ताज्या बातम्याराजकारण

मातृत्व हरपलेल्या आ. राम सातपुते यांच्या पाठीशी लाडक्या बहिणीचे पाठबळ; आईचा आशीर्वाद बहिणी देणार..

श्रीराम बंगला कार्यकर्तुत्वाने प्रेरणा देणाऱ्या जिजाबाईंचे स्मृतिस्थळ बनणार.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महायुतीच्या सरकारने अनेक समाजहिताचे व्यक्तिगत लाभाचे निर्णय घेतलेले आहेत‌. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविल्यामुळे महाराष्ट्रात लाडक्या बहिणी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती मतदार संघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री सौ. जिजाबाई यांचे दुःखद निधन झालेले आहे. मातृत्व हरपलेल्या आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणीचे पाठबळ स्वर्गीय आईचा आशीर्वाद लाडक्या बहिणी देणार अशी, माळशिरस विधानसभा मतदारसंघात राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून माळशिरस विधानसभा मतदार संघातील सर्व जाती धर्मातील 01 लाख 24 हजार महिलांच्या खात्यावर 1500 रुपये प्रमाणे 7500 रुपये जमा झालेले आहेत. महिलांना शासनाने अडचणीच्या काळात दीपावलीच्या पूर्वसंध्येला खात्यावर पैसे जमा केलेले असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब महिलांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी झालेली आहे. त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणी आपला लाडका भाऊ रामभाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पाहावयास मिळत आहेत. राजकारणी नवरा कोणत्याही पक्षात गटात असला तरी सुद्धा महिलांनी आमदार राम सातपुते यांना मतदानातून आशीर्वाद देण्याचा निश्चय केलेला आहे.

आमदार राम सातपुते यांच्या सिंहाचा वाटा असणाऱ्या कार्य कर्तुत्वाने प्रेरणा देणाऱ्या स्वर्गीय जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे मांडवे येथील श्रीराम बंगला याठिकाणी स्मृतीस्थळ बनणार आहे. खऱ्या अर्थाने मातोश्री जिजाबाई यांनी अखेरचा श्वास घेतला, त्याच श्रीराम बंगल्यात आमदार राम सातपुते यांनी वास्तव्य करून शेवटच्या श्वासापर्यंत माळशिरस तालुक्याच्या जनतेची सेवा करणार असल्याचे गाव भेटीत व जाहीर सभेमध्ये सांगितलेले आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्याने वैफल्यग्रस्त विधाने करून समाजामध्ये दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. आमदार यांनी बंगला विकायास काढलेला आहे, अशी चुकीची आवयी देऊन विरोधकांनी आपली राजकीय पातळी दाखवून दिलेली आहे. माळशिरस तालुक्यातील लाडक्या बहिणी लाडक्या भाऊच्या पाठीशी ठामपणे उभा राहून विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी माळशिरस तालुक्यातील महिलांनी कंबर कसलेली पहावयास मिळत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button