ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

विलासराव देशमुखांच्या विक्रमाशी देवेंद्रजी फडणवीसांची बरोबरी; यंदा सहाव्यांदा विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर (बारामती झटका)

आषाढी एकादशीनिमित्त यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार असून, त्यांना सहाव्यांदा हा मान मिळणार आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सर्वाधिक सहा वेळा शासकीय महापूजा करण्याच्या विक्रमाशी फडणवीस बरोबरी करणार आहेत.

महापूजेच्या इतिहासात विलासराव देशमुख यांनी २००० ते २००८ या काळात एकूण सहा वेळा विठ्ठलाची शासकीय महापूजा केली होती. देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वी २०१५, २०१६, २०१७, २०१९ आणि २०२५ मध्ये महापूजा केली असून, यंदाच्या पूजेनंतर तेही सहा वेळा शासकीय महापूजा करणाऱ्या नेत्यांच्या यादीत विलासराव देशमुख यांच्या बरोबरीने विराजमान होणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button