आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते ‘स्त्री : संघर्ष ते स्वराज्य २०२६’ विशेषांकाचे स्वागत

फुलंब्री (बारामती झटका)
फुलंब्री तालुक्याच्या आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण यांनी “स्त्री : संघर्ष ते स्वराज्य २०२६” या स्त्री शक्ती मंचाच्या चौथ्या वार्षिक विशेषांकाचे स्वागत केले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील अभ्यासू लेखक, लेखिका, विचारवंत, सामाजिक, प्रशासकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या लेखनाने समृद्ध झालेल्या या विशेषांकात स्त्रीच्या संघर्षापासून स्वराज्यापर्यंतच्या प्रवासाचे विविध अंगांनी प्रकाश टाकण्यात आला आहे.
अंकाचे मुख्य संपादक चंद्रकांत तायडे यांच्यासह महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या स्त्री शक्ती मंचाच्या कार्यकारी संपादक भगिनींचे परिश्रम, समन्वय आणि योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. विशेषांकाच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण, सामाजिक परिवर्तन आणि वैचारिक प्रबोधनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
यावेळी आमदार चव्हाण यांनी विशेषांकाच्या संकल्पना व सामाजिक उपयुक्ततेबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी सचिन मोटे तसेच आमदारांच्या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



