माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादास भाऊ पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त उप अभियंता धनंजय पाटील यांना पितृषोक….
कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर, ता. माळशिरस गावचे ज्येष्ठ नेते माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादासभाऊ माणिकराव पाटील यांचे वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 24/07/2026 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, परतवंडे, असा मोठा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त उप अभियंता धनंजय पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्यावर आजच सकाळी 11.30 वाजता लक्ष्मी नगर कण्हेर येथील निवासस्थानाशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहे…
अंबादास भाऊ यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पाटील घराण्यात झालेला आहे. माणिकराव पाटील यांचा मोठा परिवार आहे. या परिवारात अंबादास भाऊ यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती पदावर काम केलेले आहे. अंबादास भाऊंचा स्वभाव मनमिळावू असून ते सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना कायम सहकार्य करीत असत.
माळशिरस तालुक्यात अनेक वर्ष नातवंडे येईपर्यंत एकत्र मोठे कुटुंब होते. कालांतराने विभक्त राहिलेले असले तरीसुद्धा एकमेकांचा स्नेह व जिव्हाळा कमी झालेला नव्हता. अंबादास भाऊ यांना घरात, गावात व तालुक्यात आदराचे स्थान होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी अशी भाऊंची वागण्याची पद्धत होती. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन राजकारण केलेले आहे.

अंबादास भाऊ यांच्या दुःखद निधनाने पाटील परिवार यांच्यासह कण्हेर गावासह माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. भाऊंच्या दुःखद निधनाने पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. भाऊंच्या आत्म्याला शांती लाभो व पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे….
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



