आरोग्यताज्या बातम्या
नातेपुते येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी, उपचार, ऑपरेशन व चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस, येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना यांच्या वतीने शुक्रवार दि. २८/०७/२०२३ रोजी सकाळी १० वा. मोफत नेत्र तपासणी, उपचार, मोफत ऑपरेशन व नाममात्र दरात चष्मे वाटपाचा कार्यक्रम कवितके सांस्कृतिक भवन, नातेपुते येथे आयोजित करण्यात आला आहे. यासाठी बुधरानी हॉस्पिटल, पुणे यांचे विशेष सहकार्य असणार आहे.
या शिबिराची मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणावर अल्प दरात उपचार व शस्त्रक्रिया अशी वैशिष्ट्ये आहेत. तरी जास्तीतजास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
