महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. लक्ष्मीबाई चव्हाण साक्षात लक्ष्मीचा पायगुण असणाऱ्या यशस्वी नगराध्यक्षा ठरल्या..
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महाळुंग नगरीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कुंडलिक भाऊ रेडे पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरले…
पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या स्वागतासाठी महाळुंग नगरी सज्ज झाली आहे.
महाळुंग (बारामती झटका)
जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई यांचा वसा व वारसा जोपासणाऱ्या महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. लक्ष्मीबाई अशोकराव चव्हाण साक्षात लक्ष्मीचा पायगुण असणाऱ्या यशस्वी नगराध्यक्षा ठरलेल्या आहेत. महाळुंग पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असणारे पावन व जागृत यमाई देवीचे मंदिर जीर्णोद्धार व मंदिर परिसर विकास गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागाचे ज्येष्ठ नेते महाळुंग नगरीचे थोर सुपुत्र स्वर्गीय कुंडलिक भाऊ रेडे पाटील यांचे यमाई देवीच्या मंदिराचा विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न होते. स्वर्गीय कुंडलिक भाऊ रेडे पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरवणारे माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व माढा विधानसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या स्वागतासाठी महाळुंग नगरी सज्ज झाली आहे.
महाळुंग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा बहुमान लक्ष्मीबाई अशोकराव चव्हाण यांना मिळालेला आहे. सर्वसामान्य परिवारातील असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी माहीत आहेत. तसेच धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे यमाई देवीच्या निस्सिम भक्त आहेत. यमाई देवीचा जीर्णोद्धार व मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती.
माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांना महाळुंगचे शिष्टमंडळ वेळोवेळी भेटत होते. दोन्हीही लोकप्रतिनिधींचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पुरातत्त्व खात्याची वारंवार अडचण येत होती. यासाठी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय पुरातत्त्व मंत्री किशन रेड्डी यांच्या समवेत महाळुंग नगरीचे ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक रावसाहेब सावंत पाटील, यशस्वी नगराध्यक्षा यांचे पती जेष्ठ नेते अशोकराव चव्हाण, महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर, नगरसेवक युवा नेते विक्रमसिंह लाटे पाटील यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथील संसदेमधील कार्यालयात भेट घेऊन सर्व माहिती व कागदपत्रे देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
ना. किशन रेड्डी यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना करून संबंधित शिष्ट मंडळाची भेट घेऊन सदरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे महाळुंगच्या यमाई देवीचा 40 वर्षापासून रखडलेला प्रलंबित प्रश्नाला फोडणारे लोकप्रतिनिधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे या उभयतांच्या सपत्नीक जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यमाईदेवीचा प्रलंबित प्रश्न सुटावा, यासाठी जेष्ठ नेते रावसाहेब सावंत पाटील यांनी यमाई देवीला सुवर्ण अलंकाराचा नवस यशस्वी लोकप्रतिनिधी व यशस्वी नगराध्यक्षा यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. लोकप्रतिनिधी यांच्या स्वागतासाठी महाळुंग नगरी व यमाईदेवी भक्त सज्ज झालेले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये
बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील
98 50 10 49 14 हा नंबर समाविष्ट करावा..
What a well-written and thought-provoking article! It offered new perspectives and was very engaging. Im curious to hear other opinions. Feel free to visit my profile for more related content.