चांदापुरी येथील तेजस्वीनी लोखंडे हिचे एम टेक परीक्षेत दैदिप्यमान यश…
चांदापुरी (बारामती झटका)
चांदापुरी ता. माळशिरस येथील कु. तेजस्वीनी बापु लोखंडे हिने एम टेक परीक्षेमध्ये 88.38 टक्के एवढे गुण मिळवुन दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थीतीत चांदापुरी येथील बापु लोखंडे यांनी काबाड कष्ट करुन मुलांना उच्च विद्याविभुषित केले आहे.
चांदापुरी – पिलीव परिसरांतून चांगले गुण मिळवून एम टेक (कॉम्प्युटर) झालेल्या तेजस्विनी लोखंडे यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्या सध्या स्वेरी (गोपाळपुर ता. पंढरपूर ) येथील कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणुन सेवेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या स्प्रृहनिय यशाबद्धल स्वेरी कॉलेज पंढरपुर, माळशिरसचे लोकप्रिय आमदार राम सातपुते, चांदापुरीचे सरपंच जयवंत आण्णा सुळ, तात्या चोरमले, शाहिद शेख, विजय पाटील, दत्ता निकम, आप्पा सरतापे, पत्रकार रशिद शेख, सर्व ग्रामपंचायत सदस्य चांदापुरी यांनी अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..
Wonderful analysis! Your insights are very enlightening. For those interested in further details, here’s a link: DISCOVER MORE. Keen to hear your views!