महाराष्ट्र प्रेम करतो, आशीर्वाद देतो, पण, चुकणाऱ्यांचा हिशोब करतो – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
पंधरा वर्षांपूर्वी दिलेले वचन पाळता आले नाही…
पुन्हा माढा लढवण्याची पवारांची हिम्मत झाली नाही…
माळशिरस (बारामती झटका)
पंधरा वर्षांपूर्वी माढ्यातून निवडणूक लढवताना एका मोठ्या नेत्याने इथे पाणी देण्याचे वचन दिले होते पण, ते वचन पाळले नाही. त्या नेत्याला आता शिक्षा देण्याची, धडा शिकवण्याची वेळ आली आहे. म्हणूनच या नेत्याला इथून लढण्याची हिंमत झाली नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. महाराष्ट्रातील जनता जेव्हा प्रेम देते, आशीर्वाद देते तेव्हा काहीच कसर सोडत नाही, भरभरून देते. पण जर कोणी आपले वचन पूर्ण केले नाही तर हीच महाराष्ट्राची जनता तेही बरोबर लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोब व्यवस्थित चुकता करते, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना इशाराही दिला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सध्या महाराष्ट्रात तळ ठोकून आहे. मंगळवारी दुपारी माळशिरसमध्ये खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह महायुतीचे आजी-माजी आमदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पुण्यात झालेल्या सभेत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे अतृप्त आत्मा म्हटले होते. आज मोदी यांनी माढ्याच्या पाणी प्रश्नावरून आणि ऊस दरावरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणाले पंधरा वर्षांपूर्वी एक मोठे नेते निवडणूक लढवण्यास येथे आले होते. तिथे दुष्काळाने प्रभावित क्षेत्रात पाणी पोहोचवू अशी शपथ त्यांनी तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने घेतली होती. त्यांनी पाणी दिलं नाही ?, ना वचन पाळले….
कृषिमंत्र्यांनी माझेही ऐकले नाही
देशात नव्वदीच्या दशकापासून प्राप्तिकरामुळे साखर कारखाने त्रस्त होते. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना पवारांना वारंवार समजवायचो की, तुमच्या महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने आहेत. आमच्या गुजरातमध्ये ही आहेत. तेथील साखर कारखान्यांची प्राप्तीकरांची समस्या मी अनेकदा कृषी मंत्र्यांपुढे मांडली होती. पण, कृषिमंत्री असताना शरद पवारांनी ही समस्या सोडवली नाही. आमचं सरकार आल्यावर आम्ही ही समस्या निकालात काढली. आम्ही साखर कारखान्यांना दहा हजार कोटींचा दिलासा देऊन जुना प्राप्तिकर माफ केला. याचा मोठा फायदा ऊस उत्पादकांना मिळाला, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.
प्रलंबित १०० पैकी ६३ सिंचन प्रकल्प पूर्ण केले
मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पावर केंद्रीत केली. काँग्रेसचे प्रलंबित १०० पैकी ६३ प्रकल्प आम्ही पूर्ण केले आहेत. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे ध्येय आहे. २०१४ मध्ये सुमारे १०० सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी २६ प्रकल्प महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राला किती मोठा विश्वासघात दिला आहे, याची कल्पना करा. देशाच्या संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेत सहकार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मोदी कटिबद्ध आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये तुम्ही पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले, तेव्हा आम्ही प्रथमच सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले.
काँग्रेसने ६० वर्षे गरिबी… गरिबी… म्हणत जप करत
६० वर्षांपूर्वी गरीबी हटवण्याचा नारा काँग्रेसने दिला होता. गरीबी… गरिबी… म्हणत जप करत होते. मात्र, गरिबी काय म्हटली नाही. मराठवाडा असो, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळण्याचे हे पाप वर्षानुवर्षे होत आहे. देशाने काँग्रेसला ६० वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या ६० वर्षात जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले पण, काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. गेल्या ६० वर्षात काँग्रेसने जे केले नाही ते, आम्ही या दहा वर्षात केल्याचे मोदी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीला मागितली जनतेची माफी
मोदींनी सभेच्या सुरुवातीला जनतेची माफी मागितली. मी वेळेत सभा सुरू करतो. नेते उशिरा येत असल्याने जनतेला उशिरा येण्याची सवय लागली आहे. पण, मी प्रत्येक सभेला वेळेत पोहोचतो. त्यामुळे अनेक लोक उशिरा येत आहेत, अजूनही लोक येत आहेत. पण, मी त्यांच्यासाठी न थांबता माझ्या भाषणाची सुरुवात करतो, असं म्हणत जनतेची माफी मागितली.
यांची उपस्थिती
माढा मतदार संघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या महाविजय संकल्प सभेत आमदार शहाजी पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, प्रशांत परिचारक, दिलीप यड्रावकर, प्रसाद लाड, कल्याणराव काळे, आमदार गोपीचंद पडळकर, नीलमताई गोऱ्हे, सदाभाऊ खोत, जयकुमार शिंदे, रंजन गिरमे, संजीवनी पाटील, रश्मी बागल, शिवाजी सावंत, सोमनाथ वाघमोडे, चेतन केदार सावंत, संदीप पोळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मतदान आधी जलपान नंतर
मतदान केल्याशिवाय जलपान करू नका. कितीही ऊन असले तरी मतदान जाऊन करा. खासदार निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा. निंबाळकरांना मत म्हणजे मोदीला मत असे आवाहन मोजणी केले.
स्थिर सरकार भविष्य आणि वर्तमानाची काळजी घेते
पंतप्रधान म्हणाले, एक स्थिर सरकार भविष्यातील गरजा लक्षात ठेवते आणि वर्तमानाची देखील काळजी घेते. आज आपण रेल्वे, रोडवेज आणि एअरवेज मध्ये मोठी गुंतवणूक करत आहोत. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आमचे वार्षिक बजेट काँग्रेसच्या मूलभूत बजेटच्या दहा वर्षांच्या बरोबरीचे आहे. इंडिया आघाडीमध्ये ताळमेळ नाही. सत्ता मिळण्यासाठी २७३ जागा लागतात. काँग्रेसकडे जवळपास २०० ते २५० जागांसाठी उमेदवार मिळाले नाही. जे जिंकायला निवडणुकीत उतरलेच नाहीत, तर त्यांना मत देऊन तुमचे मत वाया कशाला घालता, असा सवाल मोदी यांनी उपस्थित नागरिकांना केला.
मोदींच्या भाषणातील आणखी ठळक मुद्दे
*लाईट बिल शून्यावर आणण्यासाठी सोलर योजना आणली
*एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या
*काँग्रेसचे सरकार तुम्हाला लुटणारे सरकार
*काँग्रेस तुमची संपत्ती तुमच्या मुलाबाळांना न देता तुमच्याकडून काढून घेऊन सरकारमध्ये जमा करणार
*राम मंदिराचे स्वप्न मी पूर्ण करून दाखवले
*मताच्या राजकारणामुळे काँग्रेसने राम मंदिर बांधले नाही
*रखडलेला निळवंडे प्रकल्प आम्ही पूर्ण केला आहे
*प्रत्येक शेतात आणि घरापर्यंत पाणी पोहोचवणे हेच माझे मिशन
*पाच वर्षात अकरा कोटी घरात नळाचे पाणी दिले
*अमृत सरोवर ही अमृत महोत्सवी वर्षात योजना सुरू केली
*सहकार क्षेत्रासाठी आम्ही नवीन मंत्रालय निर्माण केले
*पुढील पाच वर्षात सगळीकडे साठवणूक केंद्र तयार करणार.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा
Hi, I was searching through Siri on my phone and I couldn’t find you.
We know how to flood your business with customers from Siri and the 4 other voice search platforms (Amazon Alexa, Google Assistant, Microsoft Copilot, and Samsung Bixby).
Not only do we know how to register your business on these platforms, we know how to rank your business within the top 3 reach results to flood your business with high intent customers looking to buy.
Would it be a bad idea to have your business be in the top 3 search results?
I didn’t think so 🙂
You can learn more here:
https://vocalseek.com/
Very insightful piece! Its always great to see well-researched articles like this. Lets discuss further. Check out my profile!