महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या संचालकपदी कमलाकर माने देशमुख तर तज्ञ संचालकपदी मदनसिंह जाधव यांची निवड…

वेळापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या संचालक पदी श्री कमलाकर (तात्या) माने देशमुख व तज्ञ संचालक पदी मदनसिंह जाधव यांची निवड झाल्याबद्दल यांची निवड झाल्याबद्दल शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त करून समाधान व्यक्त करण्यात आले. या पदाचा वापर ऊस उत्पादकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी, उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी विविध ठिकाणी शेतकरी मेळावे घेऊन प्रयत्न करणार आहोत, तसेच उसाचा पिक विम्यात समावेश करावा यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे कमलाकर (तात्या) माने देशमुख व मदनसिंह जाधव यांनी सांगितले.
या निवडीबद्दल शिक्षक परिवार, वेळापूर यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमरसिंह (भैय्या) माने देशमुख, माळशिरस तालुका शिक्षण पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रदीप अवताडे, शेरी शाळा नं. १ शाळेचे मुख्याध्यापक डॉ. प्रेमनाथ रामदासी, शिक्षक संघाचे प्रसिद्धीप्रमुख बापूराव नाईक नवरे, कार्यकारी अध्यक्ष पांडुरंग वाघ, धनाजी नवले, भांगेरा माळ वस्ती शाळा मळोली चे मुख्याध्यापक संतोष काळे, भीमराव मगर, राघवेंद्र पोतदार आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी शेतकरी वर्गातून पण या निवडीचे कौतुक करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख व धैर्यशील माने देशमुख (देसाई )यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमरसिंह (भैय्या) माने देशमुख, शहाजीराव (दाजी) शिर्के, धनंजय माने देशमुख, धैर्यशील माने देशमुख (देसाई) शाळा व्यवस्थापन समितीचे शेरी शाळा नं. २ चे अध्यक्ष सुधीर माने देशमुख, सुधीर सुक्रे, तानाजी माने देशमुख, एकनाथ माने देशमुख, शिवाजी माने देशमुख, उदय माने देशमुख, सचिन माने देशमुख, सुनील शिंदे, बबलू माने देशमुख, संकेत माने देशमुख, रणवीर माने देशमुख, यशोदीप माने देशमुख, दत्तात्रय साठे, भारत माने देशमुख, गजानन माने देशमुख, जयसिंग माने देशमुख आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.