महाराष्ट्र शासनाचा न. चि. केळकर पुरस्कार डॉ. राजेंद्र मगर यांना जाहीर..

आपल्या तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब – लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाचा, २०२४ चा न. चि. केळकर पुरस्कार निमगाव मगराचे, ता. माळशिरस येथील डॉ. राजेंद्र सर्जेराव मगर लिखित मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे यांच्या चरित्रास मिळाला असुन पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये रोख मानपञ दि. २८ फेब्रुवारीला मुख्यमंञी एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते मुंबई समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. राजेंद्र मगर यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड कमिटीच्यावतीने संशोधनपर ग्रंथ संपदा निर्माण केली. समाजाला फारसे माहित नसणारे व्यक्तीमत्व गंगाराम भाऊ मस्के दामोदर सावळाराम यंदे व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर अभ्यासपूर्ण ग्रंथ संपदा डॉ. राजेंद्र मगर यांनी निर्माण केल्याने या पुर्वी शासनाकडून व सामाजिक संस्थांकडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष लेखक बाबा भांड मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर ओंकार, साखर कारखाना परिवाराचे अध्यक्ष बाबुराव बोञे पाटील, दमदार लोकप्रिय आमदार राम सातपुते, संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, डॉ. शिरीष लांडगे, निमगावचे सरपंच सुभाष साठे यासह साहित्यिक, लेखक तसेच निमगाव ग्रामस्थांनी मगर यांचे अभिनंदन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.