महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झाला…

धुळे विमानतळावरून लातूर विमानतळ व हेलिकॉप्टरने सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार.
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार धुळे जिल्ह्याचा दौरा आटोपून धुळे ते लातूर विमान प्रवास करून शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यात हेलिकॉप्टरने रे नगर कुंभारे, ता. दक्षिण येथे हेलीपॅडवर 09.30 वाजता आगमन होणार आहे. मोटारीने सोलापूर शहरात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर चे दर्शन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक व पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी रामवाडी यूपीसी सेंटर प्रभाग क्रमांक 22 रामवाडी येथे आगमन होणार आहे.

महिला सर्व रोग निदान आरोग्य शिबिर व विविध विकासकामांचा शुभारंभ, त्यानंतर किसन जाधव यांचे निवासस्थानी आगमन व राखीव. नंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय जुनी मिल कंपाऊंड चौक सोलापूर उद्घाटन फीत कापणे, जामगुंडे मंगल कार्यालय आसरा चौक येथे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आटोपून हॉटेल बालाजी सरोवर येथे अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ट्रस्टी संवाद कॉन्फरन्सला उपस्थिती. त्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे कार्यकर्त्यांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी राखीव सदरच्या ठिकाणी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर यांचे शिष्ट मंडळ व सोलापूर जिल्हा व्यापारी शिष्ट मंडळ यांच्याशी बैठक. नंतर मोटारीने येणे. श्री. आनंद चंदनशिवे नगरसेवक यांच्याकडे मोटार येणे. तिर्हे माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी राखीव व नंतर मोटारीने प्रयान होणार आहे.

असा दौरा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांनी देवगिरी निवासस्थान मुंबई येथून जाहीर केलेला आहे. उपमुख्यमंत्री यांना झेड प्लस सुरक्षा उपलब्ध असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.