‘महाराष्ट्राचा लोकप्रिय आण्णा’ – श्री. मुरलीधर मोहोळ सर
नवी दिल्ली (बारामती झटका)
नवी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांना ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय आण्णा’ या नावाची अप्रतिम सुंदर कविता जवान, लेखक, कवी, विचारवंत श्री. विकास पंढरीनाथ वाघमारे यांनी फक्त दहा मिनिटांमध्ये तयार करून भेट दिली आहे. व त्यांच्या ‘माझी माय मराठी’ या कविता पुस्तकावर केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांची अनमोल स्वाक्षरी घेतली आहे.
‘महाराष्ट्राचा लोकप्रिय आण्णा’
मा. श्री. मुरलीधर मोहोळ सर
केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार
पुणे जिल्ह्याच्या कला संस्कृतीचा आण्णा खरा वारसदार,
मुरलीधर आण्णा काळ्या मातीत घडलेला पैलवान,
आण्णाचं चालणं-बोलणं जनतेच्या मनाला भुरळ पाडतं,
आण्णाच्या चेहऱ्यावरचं हास्यस्मित सर्वांचे मन जिंकत,
स्वतःच्या कर्तुत्वावर पुणे जिल्ह्याचा इतिहास घडवला,
पुणेच्या जनतेने आण्णाला लोकप्रिय खासदार पदी दिल्ली दरबारी पाठवला,
पहिल्याच प्रयत्नात आण्णा लोकसभा सदस्य बनला,
स्वतःच्या नेतृत्वावर केंद्रीय राज्यमंत्री पदाचा कार्यभार भेटला,
महाराष्ट्राचा भगवा झेंडा आण्णांनी गगनी फडकवला,
दिल्लीच्या दरबारी आण्णांच्या स्वभावाचा मराठी पताका झळकला….
श्री विकास पंढरीनाथ वाघमारे जवान लेखक कवी विचारवंत राष्ट्रीय राजधानी-नवी दिल्ली….
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.