माजी नगरसेवक अशोक वाघमोडे यांचे दुःखद निधन

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक अशोक रामहरी वाघमोडे यांचे दि. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुःखद निधन झालेले आहे.
अशोक वाघमोडे हे बैलगाडा शर्यतीतील नामांकित बैलगाडा मालक होते. अशोक वाघमोडे यांनी कमी वयात नगरसेवक होण्याचा मान मिळवला होता. त्यांनी मनसे विद्यार्थी सेना माळशिरस शहर अध्यक्ष पद काही दिवस भूषवले होते. सामाजिक कार्यात ते नेहमी पुढे असत. त्यांच्या कार्यकाळात वार्ड क्रमांक तीन मध्ये बरेच दिवसांपासून रखडलेले अनेक रस्ते मार्गी लागले होते. त्यांचा स्वभाव मन मिळावू, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा होता. त्यांच्या जाण्याने वाघमोडे परिवारावर व माळशिरस गावावर खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. अशोक वाघमोडे कमी वयात वाघमोडे परिवारात एक धाडसी नेतृत्व तयार झाले होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अशा या महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.


अशोक वाघमोडे यांच्या आत्म्यास शांती लाभो व वाघमोडे परिवारास या दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.