माळशिरस तालुक्याच्या इतिहासात सोनेरी पानावर देशाची मान उंचावणारी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या घटनेची नोंद राहणार….
आशियाई क्रीडा स्पर्धेत माळशिरसची सुकन्या ऋतुजा भोसले व माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी दैदीप्यमान कामगिरी…
माळशिरस (बारामती झटका)
आशियाई क्रीडा स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील लवंग गावची सुकन्या ऋतुजा भोसले आणि रोहन बोपण्णा यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत 10 – 4 असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला एक सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्यापासून वंचित असणारी कायम दुष्काळी गावांचा निरा-देवधर प्रकल्पाचा प्रलंबित प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण गावचे थोर सुपुत्र माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सदरच्या रखडलेल्या प्रलंबित प्रकल्पासाठी निधी मंजूर करून माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील पिढ्यानपिढ्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. माळशिरस तालुक्याच्या इतिहासात सोनेरी पानावर देशाची मान उंचावणारी व शेतकऱ्यांची जीवनमान उंचावणाऱ्या घटनेची नोंद राहणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत माळशिरसची सुकन्या ऋतुजा भोसले व माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दैदिप्यमान कामगिरी सुवर्ण अक्षराने लिहिली जाणार आहे. ऋतुजा भोसले हिची कामगिरी देशासाठी तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बळीराजासाठी कामगिरी झालेली आहे.
माळशिरस तालुक्यात रविवार दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी महामार्गावरून सुवर्णकन्या ऋतुजा भोसले यांचे सराटी वरून माळशिरस तालुक्यात आगमन होणार आहे. तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गावरून धर्मपुरी वरून कोथळे गावात माळशिरस तालुक्यात पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आगमन होणार आहे. दोघेही दैदीप्यमान कामगिरी करून येत असल्याने स्वागताची जंगी तयारी माळशिरस तालुक्यात सुरू आहे. जंगी स्वागत करून ऋतुजा भोसले यांचा लवंग येथे सत्कार होणार आहे तर खासदार नाईक निंबाळकर यांचा कोथळे, कण्हेर, गारवाड या ठिकाणी सत्कार होणार आहे. दोन्हीही कामगिरी करणाऱ्या योद्धांचा सन्मान एकाच दिवशी येत असल्याने तोसुद्धा माळशिरस तालुक्याला दुग्धशर्करा सुवर्णयोग आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng