कृषिवार्ताताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावांचा झंजावाती दौरा.

तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा-देवधर प्रकल्पात समाविष्ट व उर्वरित गावांचा अधिकाऱ्यांसमवेत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्यापासून वंचित असणारी, कायम दुष्काळी गावांचा निरा-देवधर प्रकल्पामध्ये समाविष्ट होऊन अनेक वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सदरच्या प्रलंबित प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याने माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील नीरा-देवधर प्रकल्पात समाविष्ट व उर्वरित गावांचा समावेश करण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावांचा झंजावाती दौऱ्याचे आयोजन रविवार दि. 08 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आलेले आहे.

माळशिरस तालुक्यातील निरा-देवधर प्रकल्पामध्ये कोथळे, फडतरी, लोंढे मोहितेवाडी, भांब, जळभावी, गारवाड, मगरवाडी, तरंगफळ, पठाणवस्ती, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी या गावांसह पिलीव, काळमवाडी, कोळेगाव याही गावांचा समावेश करण्यासाठी सर्वच गावांच्या निरा-देवधर कमांडमधील गावांना सदिच्छा भेट देऊन शेतकऱ्यांशी अधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता कोथळे येथील ग्रामदैवत थांबलींग मंदिरापासून दौऱ्यास सुरुवात होणार आहे. कण्हेर व गारवाड अशा तीन ठिकाणी शेतकरी एकत्र करून अधिकाऱ्यांसमवेत सल्लामसलत करून निरा-देवधर प्रकल्पाचा लवकरच शुभारंभ करण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे.

पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनेक दिवसाचा शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न सातत्याने प्रयत्न करून दुष्काळी गावांना दिलासा दिलेला आहे. पहिल्यांदाच कायम दुष्काळी गावांचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढलेला असल्याने मतदार व शेतकरी बांधव यांच्यामधून समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदरच्या दौऱ्याविषयी निरा-देवधर उर्वरित संघर्ष समितीचे अध्यक्ष जलनायक शिवराजभैय्या पुकळे यांच्याशी 9922656001 या क्रमांकावर संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button