ताज्या बातम्याराजकारण

संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार

माळशिरस (बारामती झटका)

देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर निष्ठा व प्रेम असणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांचा संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा रविवार दि. ८/१०/२०२३ सकाळी ८.०० वाजता ‘शिवतीर्थबंगला’ (श्री. शंकरनाना देशमुख यांचे निवासस्थान), मेरिडियन हॉटेल मागे, माळशिरस, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षनिरीक्षक शेखर माने यांच्यासह जिल्ह्यातील, तालुक्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort