ताज्या बातम्यासामाजिक

माळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी माळी महासंघाचे प्रयत्न : शंकरराव वाघमारे

उत्तर सोलापूर (बारामती झटका)

माळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी माळी महासंघाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून यामुळे सोलापुर जिल्ह्यात गावागावात माळी महासंघाच्या शाखा निघत आहेत. आपल्यातील एकीच्या बळाचा आपण समाजहितासाठी उपयोग करावा, असे आवाहन माळी महासंघ किसान आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी येथे माळी महासंघाची शाखा स्थापन करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे होते. गावातील श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माळी महासंघाच्या फलकाचे अनावरण फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अभियंता आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष प्रकाश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधव एकत्रित आले होते. यावेळी युवक तालुकाध्यक्ष कृष्णात माळी उपस्थित होते. शाखाध्यक्ष तुकाराम ज्ञानोबा माळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच यावेळी सर्व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना वाघमारे म्हणाले की, इतर सर्व समाज एकत्रित येवून संघटीत होऊन समाजाच्या हितासाठी विधायक कार्य करत आहेत. आपल्या मागण्या शासन दरबारी मांडत असतात, आपल्या न्याय हक्कासाठी लढत असतात. गावोगावी आपला माळी समाजही संघटीत व्हावा, आपल्या न्याय हक्कासाठी लढावा, याकरिता माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी समाजातील अनेक बुध्दीजिवीना एकत्रित करून सामाजिक कार्य हाती घेतले. म्हणूनच भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे, हा फुले दांपत्याच्या सन्मानाचा विचार शासन दरबारी पोहचवून यासाठी निधीही मिळवला. समाज बांधवांनी आपला विकास साधावा, समाजातील समस्या सोडविण्यासाठी समाजाला गाव तिथं शाखा हे एक माध्यम आहे. या प्रवाहात येण्याचं आवाहन केले. याप्रसंगी सुधाकर जांभळे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येण्याची भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर शिवाजी माळी यांनी केले तर, आभार हनुमंत हरी माळी यांनी मानले.

यावेळी काशिनाथ बापू माळी, लहु शामराव माळी, जांभुवंत माळी, विजय अभिमान माळी, जालिंदर माळी, पपण महादेव माळी, गणपत माळी, धोंडिबा माळी, विकास राजेंद्र माळी, विठ्ठल शामराव माळी, तुकाराम भागवत माळी, निवृत्ती माळी, दिनेश कुमार माळी, अभिमन्यू तुळशीराम माळी, किशोर आप्पासो माळी, रणजित बाबू माळी, लक्ष्मण माळी, शिवाजी शामराव माळी, सचिन सुखदेव माळी, आण्णासो सुखदेव माळी, हनुमंत पोपट माळी, जालिंदर माळी, अरविंद माळी, महेश मधुकर माळी, बापू माळी, सोमनाथ झुंजारे, शिवाजी शामराव माळी, तुळशीराम माळी, विष्णू मधुकर माळी, अंकुश शामराव माळी, अभिमन्यू तुळशीराम माळी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..

Related Articles

Leave a Reply

Back to top button