ताज्या बातम्यामनोरंजनशैक्षणिक

माळीनगर फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात…

२ डिसेंबरला फेस्टिव्हलचा दिमाखदार उद्घाटन सोहळा.

अकलूज (बारामती झटका)

माळीनगर येथील माळशिरस तालुक्यातील नागरिकांचे आकर्षण असलेल्या ‘माळीनगर फेस्टिव्हल’ व ‘विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाला सोमवार दि.२ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. ‘माळीनगर फेस्टिव्हल’ चे हे १९ वे वर्ष आहे. कोरोना कालावधी वगळता २००४ पासून दरवर्षी हा महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे.

फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक तथा दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, शुगरकेन सोसायटी, महात्मा फुले पतसंस्था, माळीनगर मल्टिस्टेट व माळीनगर विकास मंडळ माळीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेच्या भव्य मैदानावर दि. २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा ‘माळीनगर फेस्टिव्हल’ व ‘विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन’ होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये ११० पेक्षा जास्त स्टॉल्स उभारण्यात येत असून महिलांसाठी ज्वेलरी, इमिटेशन, विविध प्रकारचे कपडे, शोभेच्या वस्तू, चपला, बालगोपाळांसाठी खेळणी तसेच खवय्यांसाठी विविध व्हेज, नॉनव्हेज, इंडियन, चायनीज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स इत्यादींचे स्टॉल्स येत आहेत.

मनोरंजनासाठी मैदानावर भव्य मनोरंजन साधने उभारण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने आकाश मोठा पाळणा, ब्रेक डान्स, सॅलेम्बो, कोलंबस (जहाज), ड्रॅगन ट्रेन, टोराटोरा, वॉटर बोट, मिनी ट्रेन यासह यावर्षी नवीनच टॉवर बोल्ट, वॉटर बलून ही साधने उभारण्यात येत आहेत. लहान मुलांसाठी जम्पिंग, बाऊंसी, मिकी माऊस, हेलिकॉप्टर, चक्री इत्यादी असंख्य साधने समाविष्ट आहेत.

प्रशालेच्या मैदानावरील खुल्या भव्य रंगमंचावर सासवड माळी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, हायस्कूल, ज्यु कॉलेज, किमान कौशल्य व गुलमोहर इंग्लिश मीडियम स्कूल या विभागातील विद्यार्थ्यांचे सायंकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत दररोज विविध गुणदर्शन कार्यक्रम व सांस्कृतिक स्नेहसंमेलनही संपन्न होत आहे. यामध्ये इ. १ ली ते ९ वी व इ.११ वी पर्यंतचे हजारो विद्यार्थी आपली कला दाखवणार असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. माळीनगर फेस्टिव्हल व ‘विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन’ यशस्वी होण्यासाठी माळीनगर विकास मंडळ, सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, माळीनगर साखर कारखाना, म. फुले पतसंस्था, माळीनगर मल्टिस्टेट तसेच आदी संस्थांचे पदाधिकारी, विभाग समित्या व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button