माळखांबी येथील बाळकृष्ण भांगे यांचे माळशिरस तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण…

जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे संतोष चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी व त्यांच्या मालकीच्या जुन्या वाड्यातील घडीव दगडांचा ताबा मिळणेसाठी तहसीलदार यांना निवेदन
माळखांबी (बारामती झटका)
माळखांबी, ता. माळशिरस येथील श्री. बाळकृष्ण सोपान भांगे यांनी माळशिरस तहसील कार्यालयातील तहसीलदार यांना माळखांबी येथील श्री. संतोष सहदेव चव्हाण यांनी भांगे यांना मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचेवर कोणत्याही प्रकारची कारवाई व चौकशी न झाल्याने व त्याने अतिक्रमण करुन भांगे यांच्या मालकीच्या जुन्या वाड्यातील घडीव दगडांचा ताबा मिळण्यासाठी भांगे यांनी कुटूंबासह आमरण उपोषण करणार असलेबाबतचे निवेदन दि.०५/०३/२०२५ रोजी दिले होते. त्याप्रमाणे बाळकृष्ण भांगे व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक मागण्यांसाठी सोमवार दि. ०२/०६/२०२५ पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषण कर्ते बाळकृष्ण भांगे यांनी अनेक मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. यामध्ये घराला चिकटून इरिगेशनच्या जागेत ठेवलेले जुन्या वाड्याचे बुजवले घडीव दगड काढून मिळण्याबाबत तसेच भांगे कुटुंबावर झालेला अन्याय निदर्शनास आणून देऊन मारहाण केल्यावर कोणीही त्याची कोणीही दखल घेतली नाही. तसेच बाळकृष्ण भांगे यांची स्वतःची जागा असताना सुद्धा ती जागा मिळावी म्हणून २० ते २१ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर ती जागा २३ मार्च २०२५ रोजी तहसीलदार साहेब व पोलीस यांच्या साह्याने मिळाली. पण २०-२१ वर्षांपूर्वी जो खर्च घर बांधण्यासाठी येत होता तो आत्ताच्या घडीला येईल का ?, त्या खर्चाचा हिशोब करून द्यावा व त्यामध्ये न्याय मिळावा. तसेच भांगे कुटुंबावर केलेले चुकीचे आरोप यांचाही पाठपुरावा करावा. अशा मागण्यांसाठी बाळकृष्ण सोपान भांगे यांनी सहकुटुंब आमरण उपोषण केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.