सुसंगत फौंडेशन, पुणे यांचा यंदाचा ‘जीवनरक्षक पुरस्कार’ संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना जाहीर…
पुणे (बारामती झटका)
सुसंगत फौंडेशन पुणे यांच्यावतीने गेली अनेक वर्षे समाजामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, पत्रकारिता, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पत्रकारिता क्षेत्रातील ‘जीवनरक्षक पुरस्कार’ बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनलचे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांना देण्यात आला आहे. सदरचा पुरस्कार सोहळा रविवार दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. फिरोदिया ऑडीटोरियम, द इन्स्टिट्यूट कॉलेज होस्टेलसमोर आणि हॉटेल मॉडर्न कॅफे समोर, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न होणार आहे. सदरच्या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक डॉ. विनोद शहा हे असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलीस अधीक्षक ॲड. श्री. चंद्रकांत केशव पवार हे असणार आहेत.

सदरच्या फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर न्हाळदे, उपाध्यक्ष धोंडीराम गडदे, विश्वस्त सतीश खाडे, खजिनदार माणिक सोनवलकर, विश्वस्त ॲड. वैशाली वाघमोडे-करे, विश्वस्त डॉ. संयोगिता नाईक, सचिव सौ. संगीता न्हाळदे, विश्वस्त नजीर तांबोळी, विश्वस्त इंजि. विजयकुमार ठुबे, विश्वस्त डॉ. रामचंद्र पडळकर, विश्वस्त जयंत जोगळेकर आणि सल्लागार डॉ. यशवंत वाघमारे हे आहे.
तरी पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त इंजि. विजयकुमार ठुबे, विश्वस्त डॉ. रामचंद्र पडळकर आणि विश्वस्त डॉ. संयोगिता नाईक यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



