ताज्या बातम्या

मळोली येथे ‘गौराई माझी लाडाची गं” अंतर्गत गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

जय तुळजाभवानी नवरात्र उत्सव तरुण मंडळ व स्व. सौ. वेणूबाई शिवाजीराव कदम पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच गौरी गणपती निमित्त करण्यात आलेली सजावट परिसरातील लोकांना पाहता यावी यासाठी “गौराई माझी लाडाची गं”, अंतर्गत गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२४-२५ या स्पर्धेचे आयोजन सौ. स्मिता श्रीनिवास कदम पाटील (मो‌. ९०९६४३१९१४) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस २,५०० रू., द्वितीय क्रमांकाचे बक्षीस २ हजार रु., तृतीय क्रमांकाचे बक्षीस १,५०० रु., चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस १००० रु. पाचव्या क्रमांकाचे बक्षीस ७५० रु., सहावे क्रमांकाचे बक्षीस ५०० रु., सातवे क्रमांकाचे बक्षीस २५० रु., तर उत्तेजनार्थ पाच बक्षिसे असून प्रत्येकी १०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या अंगातील सुप्त कलागुण, कौशल्य यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मळोली व पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनींना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. गौरी गणपती निमित्त आकर्षक देखावे, विविध सामाजिक संदेश या माध्यमातून परिसरातील लोकांना पाहता येणार आहेत.

मळोली व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा व आकर्षक बक्षिसे जिंकावी, असे आवाहन सौ. स्मिता श्रीनिवास कदम पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

  1. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

Leave a Reply

Back to top button