सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांची माळशिरस पोलीस स्टेशन येथे सदिच्छा भेट…

माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली झाल्यानंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी पदभार घेतल्यानंतर प्रथमच माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले होते. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्री. नारायण शिरगांवकर, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

नूतन पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचा माळशिरस तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक श्री. नारायण शिरगांवकर यांनी सन्मान केला. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस प्रशासनामध्ये आयपीएस झाल्यानंतर पहिल्यांदा माळशिरस पोलीस स्टेशन येथे तीन महिन्याकरता आलेले होते. त्यामुळे त्यांना माळशिरस व माळशिरस तालुक्यातील सर्व परिस्थितीची माहिती आहे. श्री. अतुल कुलकर्णी यांनी गौरी गणपती स्थापनेच्या दिवशी माळशिरस तालुक्यातील वेळापूर, अकलूज, माळशिरस, नातेपुते येथील पोलीस स्टेशन येथे सदिच्छा भेट देऊन कायदा व सुव्यवस्था विषयी माहिती जाणून घेतली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.