माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांच्या प्रशासक काळातील कारभार व कामकाजाची चौकशी व्हावी मागणीने जोर धरला….

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे चौकशीची मागणी करूनसुद्धा चौकशी न केल्याने संशय बळावला….
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांच्या प्रशासक काळातील कार्यभार व कामकाजाची चौकशी व्हावी अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे मागणी केलेली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी चौकशी न केल्याने उंदराला मांजर साक्ष आहे का ?, असाही संशय माळशिरस तालुक्यामधील सर्वसामान्य जनता व नागरिक यांना येत आहे.
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे यांच्याकडे प्रशासक पदाचा पदभार आहे. प्रशासक काळामध्ये सभापती, उपसभापती व पंचायत समिती सदस्य यांचा कामकाजावर अंकुश नसतो. अशावेळी प्रशासक यांनी पंचायत समितीचे व पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कामकाजात फेरबदल व निधी वाटपात अनियमितता दिसून येत आहे. प्रशासक काळातील कामकाजाची कसून चौकशी करून संबंधित दोषी असणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी केली होती.
पंधरावा वित्त आयोगातील आराखड्यामध्ये मूळ प्लॅन असतो. त्यामध्ये कामात बदल करावयाचा असेल तर ग्रामपंचायतचा मासिक ठराव, पंचायत समितीतील कमिटीची मान्यता आणि काम जर जनहिताचे असेल तरच त्याला काम बदल मान्यता देणे गरजेचे आहे. मात्र, पंधरावा वित्त आयोग सोलर सिस्टीम, रस्ते, पाणीपुरवठा, मागासवर्गीय वस्तीत गटार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व बाबीवर खर्च होणे अपेक्षित आहे. असे असताना कामांमध्ये बदल करीत असताना अनियमित्ता दिसून येत नाही. जनहिताची कामे न करता अधिकाऱ्यांना व कर्मचारी यांना हाताला धरून अनियमित कामांमध्ये बदल केलेले आहेत, असा संशय आहे.
पंचायत समिती आराखड्यात वास्तविक पाहता ग्रामपंचायत १०% निधी, जिल्हा परिषद १०% निधी लोकसंख्येच्या आधारित निकषावर देणे अपेक्षित आहे. बंदित निधी स्वच्छता व पाणीपुरवठा यांची अंदाजपत्रकाप्रमाणे अनेक ठिकाणी कामे झालेली नाहीत. अशा सर्व कामांची त्रिसमितीय समिती नेमून चौकशी करावी. सदरच्या समितीमध्ये माळशिरस तालुक्याच्या बाहेरील जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करून चौकशी करावी, अशी मागणी होत होती. आपण समिती नेमून चौकशी केली नाही तर आपणास सर्व माहीत आहे, असे समजून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी करून सदर प्रकरणाचा निपटारा केला जाईल, असे आपणास पत्राद्वारे कळविलेले होते. तरीसुद्धा आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. याचा खुलासा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावा कारण, आपणाकडे सहा महिन्यापूर्वी रीतसर तक्रारी लेखी व तोंडी केलेल्या आहेत. दि. 31/05/2024 रोजी गटविकास अधिकारी श्री. विनायक गुळवे सेवानिवृत्त होत आहेत. आपण तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केलेली नाही. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी आपणावर येत आहे. भविष्यात आपल्याही विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.