जीहे कटापूर योजनेचे पावसाळी हंगामात माळशिरस तालुक्यातील गावांना अतिरिक्त पाणी देणार – ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे
माळशिरस (बारामती झटका)
आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांची त्यांच्या आंधळी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातील रेडे गावामध्ये त्यांनी जेहे काठावर योजनेतील पावसाळी हंगामामध्ये अतिरिक्त पाणी संभुखेड येथे सोडून ते पाणी रेडे येथील बंधारे व तलाव भरण्यासाठी दिले असून दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले. त्यामुळे ते आमदार असताना हे आश्वासन पूर्ण केल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
आता ते नामदार आहेत त्यामुळे त्यांनी माळशिरस तालुक्यातील जळभावी, माणकी, भांब, फडतरी या गावांना पाणी देण्यासाठी माण तालुक्यातील मोही, खुटबाव, इंजभाव, संभुखेड पर्यंत या गावांमधून पाणी सोडल्यास माळशिरस तालुक्यातील कन्हेर, लोणंद, इस्लामपूर या गावांना याचा फायदा होईल. यासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी त्यांनी या योजनेतून या गावांना पाणी देणार असे आश्वासन दिले.
यावेळी सोलापूर जिल्हा सह प्रभारी के. के. पाटील, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष युवराज वाघमोडे, मिनीनाथ मगर, ॲड गणेश सिद आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.