माळशिरस शहरात दसरा नागरिक महोत्सव नागरीकांमार्फत मोठ्या उत्साहाने साजरा.

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहरात आपला युवक शेतकरी फोरमचे अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर यांच्या जंजिरा निवासस्थानी दसरा नागरीक महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमागात साजरा झाला. त्यावेळी माळशिरस शहर व परिसरातील अनेक अबाल वृध्द, डाॅक्टर, वकील, व्यापारी, शेतकरी अशा अनेक घटकांतील जनसमुदाय उपस्थित होता.
दसरा नागरिक महोत्सव साजरा करण्याचे हे ५ वे वर्ष आहे. यावेळी आपला युवक शेतकरी फोरम तर्फे दसरा महोत्सवात दलित मित्र सामाजिक पुरस्कार श्री. शंकर बिरलिंगे यांना देण्यात आला. शिवाय माळशिरस बार असोसिएशन माळशिरसचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. पी. ए. कुलकर्णी यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

दसरा नागरिक महोत्सात सोनं देणं-घेणं हा महत्त्वाचा कार्यक्रम साजरा केला जातो. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांमार्फत उपस्थितांना सोनं दिले जाते. ज्या नागरिकांना हा मान दिला जातो तो चिठ्ठ्या टाकून निवडला जातो. ज्याच्या नावाची चिठ्ठी निघाली त्यांना सोनं देण्याचा मान दिला जातो. यावेळी श्री. भीकादास पडळकर या ज्येष्ठ नागरिकांना सोनं देण्याचा मान मिळाला. गेल्या वर्षी श्री. पोपट देशमाने यांना मान मिळाला होता. सदरचा सोनं देण्याचा कार्यक्रम अत्यंत शांतपणे व दिमाखदार संपन्न झाला. त्यानंतर अल्पोपहार, चहा व पेढे यांचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने दसरा महोत्सवात भाग घेतला व आनंद व्यक्त केला. दसरा नागरिक महोत्सव या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक धाईंजे सर यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.