माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचा स्नेह मेळावा व सन्मान सोहळा

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस व अकलूज आयोजित स्नेह मेळावा व सन्मान सोहळा शनिवार दि. २/११/२०२४ रोजी सकाळी १० वा., राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृह, पंचायत समिती माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब वाघमोडे पाटील पोलीस अधीक्षक पालघर, सदाशिव साळुंखे सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई, विश्वास पांढरे (IPS) पोलीस अधीक्षक मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई, संजय खरात (IPS) पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अहमदाबाद गुजरात, धनंजय मगर (IFS) उपवनसंरक्षक देवगड ओरिसा राज्य, जयपाल देठे (IFS) भारतीय राजदूत, सागर मिसाळ (IAS), शुभम जाधव (IPS) सहाय्यक पोलीस अधीक्षक हावडा, पश्चिम बंगाल, डॉ. रामदास भिसे (IRTS) वाणिज्य व्यवस्थापक भारतीय रेल्वे विभाग पुणे, उमेशचंद्र मोरे जिल्हा न्यायाधीश नाशिक, संदीप कुंभार सचिव केंद्रीय बाष्पक मंडळ भारत सरकार आदी मान्यवरांसहित माळशिरस तालुक्यातील भूमिपुत्र अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील/अधिकारी कर्मचारी यांचा स्नेह मेळावा व नूतन अधिकारी कर्मचारी तसेच उत्कृष्ट खेळाडू यांचा गुणगौरव सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.

तरी या सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.