ताज्या बातम्या

माळशिरस तालुका बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत राहुल लवटे पाटील विजयी.

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका बार असोसिएशन निवडणूक 2024-25 मध्ये मांडवे गावचे ॲड. राहुल लवटे पाटील यांनी येळीव गावचे ॲड. पंकज फडतरे यांचा 116 मताधिक्याने पराभव करून दैदीप्यमान विजय संपादन केलेला आहे.

माळशिरस तालुका बार असोसिएशन निवडणूक 2024-25 मध्ये अध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार ही पदे बिनविरोध झालेली होती. उपाध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली होती. 226 मतदान झालेले होते, त्यामधील ॲड. राहुल लवटे यांना 170, ॲड. पंकज फडतरे यांना 54 तर नोटा 02 असे मतदान पडलेले होते. ॲड. राहुल लवटे पाटील यांनी 116 मतांनी दैदीप्यमान विजय मिळविलेला आहे.

ॲड. राहुल लवटे पाटील यांचा वकिली व्यवसाय असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. ते सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी कायम धावून येत असतात. तालुक्यामध्ये वकील बांधवांसह इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा दांडगा जनसंपर्क आहे.

उपाध्यक्ष पदाच्या एकाच जागेची निवडणूक लागलेली असल्याने माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले होते. त्यामध्ये ॲड. राहुल लवटे पाटील यांना माळशिरस वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी विक्रमी मतदान करून विजयी केलेले असल्याने ॲड. लवटे पाटील यांनी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button