मांडकी गावचे प्रगतशील बागायतदार सोपान लक्ष्मण रणनवरे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन..

माळशिरस पंचायत समितीचे जिल्हा परिषद बांधकामांचे उप अभियंता राजाराम रणनवरे यांना पितृषोक…
मांडकी (बारामती झटका)
मांडकी ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार सोपान लक्ष्मण रणनवरे वय वर्षे 91 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी रविवार दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग माळशिरसचे उप अभियंता श्री. राजाराम उर्फ आर. एस. रणनवरे यांचे ते वडील होते. त्यांच्यावर मांडकी येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत.
मंगळवार दि. 15 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. रणनवरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय सोपान रणनवरे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.