सोलापूर विधान परिषदेसाठी गुरुवारी मतदान, प्रशासन सज्ज; ६१५ मतदार, सहा ठिकाणी होणार मतदान एक नगरसेवक मयत

सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर होणार आहे. जिल्ह्यात एकूण ६१६ मतदार असून एका नगरसेवकाचे निधन झाल्याने ६१५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
यंदा मतदारांना मतपत्रिकेवर पसंती क्रमांक देऊन मतदान करावे लागणार आहे. मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे मराठी व इंग्रजीत तसेच पक्षाचे नाव असेल, मात्र पक्षचिन्ह छापले जाणार नाही. या निवडणुकीत नोटा म्हणजेच ‘वरीलपैकी कोणीही नाही’ हा पर्याय उपलब्ध नसणार आहे. मतमोजणी २२ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे.
मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या : कुर्डुवाडी उपविभागीय कार्यालय. करमाळा, माढा व कुर्डुवाडीचे मतदान. एकूण ८० मतदार. उत्तर तहसील, सोलापूर, बार्शी, वैराग व सोलापूर महापालिका सदस्य. एकूण १८७ मतदार. दक्षिण सोलापूर तहसील. अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण तालुका. एकूण ८९ मतदार. पंढरपूर तहसील कार्यालय: पंढरपूर व मोहोळ तालुका. एकूण १० मतदार. मंगळवेढा तहसील, मंगळवेढा व सांगोला तालुका. एकूण ९२ मतदार. उपविभागीय कार्यालय, माळशिरस. माळशिरस तालुक्यातील ९७ मतदार. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
RTO कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इतर कामे ठप्प असली तरी निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू राहणार आहे. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर हजर राहून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



