ताज्या बातम्याराजकारण

सातपुते पॅटर्न’चा धडाका: 50 मतदारांसह रामभाऊंची टूर, राजाभाऊंच्या विजयाला अर्धशतकाची सलामी

सोलापूर विधान परिषद निवडणूक: महायुतीचे राजेंद्र राऊत यांच्यासाठी राम सातपुते 50 मतदारांसह मैदानात. माळशिरसच्या 97 पैकी 50 मतदार टूरवर.

मोहिते पाटील गटाला धोबीपछाड, देवाभाऊ-जयाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंचा ‘सातपुते पॅटर्न’.

राजाभाऊंच्या विजयाचा पाया माळशिरसमधूनच…

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार बार्शीचे माजी आमदार राजेंद्र उर्फ राजाभाऊ राऊत यांच्या विजयासाठी रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व माळशिरसचे लोकप्रिय दमदार माजी आमदार संघर्षयोद्धा राम सातपुते यांनी मैदानात उतरत थेट मतदारांसह टूर सुरू केली आहे.

माळशिरसचा किल्ला भक्कम
माळशिरस तालुक्यात एकूण 97 मतदार आहेत. यातील 50 मतदार राम सातपुते यांच्या समवेत टूरवर गेले आहेत. उर्वरित मतदारही राम सातपुते यांच्या थेट संपर्कात आहेत. 97 पैकी 50 मतदार म्हणजे अर्धशतक एकत्रित केल्याने माळशिरसच्या विजयाची सलामी मिळाली, अशी चर्चा आहे.

मोहिते पाटील गटाला ‘धोबीपछाड’
जिल्ह्यातील राजकारणावर अनेक दशके प्रभाव टाकणाऱ्या मोहिते पाटील गटाला धोबीपछाड देत राम सातपुते यांनी माळशिरसचा गड राखला आहे. “रामभाऊंनी पेटवलेली वात राजाभाऊंच्या रूपाने मिसाईल बनणार” या राजकीय विश्लेषणाला या टूरमुळे बळ मिळाले आहे.

देवाभाऊ-जयाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली खेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व खेळी आखली गेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात ‘गोरे पॅटर्न’ निर्माण केला. त्याच धर्तीवर माळशिरस तालुक्यात आता ‘सातपुते पॅटर्न’ तयार झाला आहे. थेट संवाद, नाराजी निवारण आणि बूथ मॅनेजमेंट ही या पॅटर्नची वैशिष्ट्ये आहेत.

मानाचा तुरा कोणाच्या शिरपेचात?
राजकीय विश्लेषकांच्या मते, विधान परिषद निवडणुकीत राजाभाऊ राऊत यांच्या विजयामध्ये राम सातपुते यांचा ‘मानाचा तुरा’ असेल. माळशिरस तालुक्यातील मतदारांची सलामीच संपूर्ण निवडणुकीचा ट्रेंड ठरवणार आहे.

पुढे काय?
विधान परिषदेच्या विजयानंतर माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलणार आहेत. पारंपरिक वर्चस्व मोडून नवा नेतृत्वाचा उदय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

#रामसातपुते #सातपुतेपॅटर्न #सोलापूरMLC #राजेंद्रराऊत #अर्धशतक

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button