इस्लामपूर मांडकी रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात; शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, शेतकऱ्यांची कोंडी….

सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात….
मांडकी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर मांडकी रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने सदरच्या रस्त्यावरून ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांच्या अधिपत्याखाली रस्ता असल्याने रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा त्रस्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत…
इस्लामपूर मांडकी रस्ता रहदारीचा आहे. सदरच्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिक, दूध व्यावसायिक व शेतकरी बांधव यांचा दैनंदिन वापराचा रस्ता आहे. सदरच्या रस्त्यावर जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने अडथळा होईल, अशा पद्धतीने दगड धोंडे टाकलेले आहेत. त्यामुळे सदर रस्त्याचा वापर करीत असताना वाहनांना ये-जा करत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांनी जातीने लक्ष घालून सदरचे रस्त्यावरील धोकादायक दगड धोंडे काढून वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा. अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र असल्याचे त्रस्त व सुज्ञ नागरिक यांच्यामधून बोलले जात आहे…

सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज यांनी सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढले नाही तर सदरच्या रस्त्यावर अतिक्रमणामुळे नाहक त्रास होत असलेल्या नागरिकांच्या मुलाखती बारामती झटका यूट्यूब चॅनल वर प्रसिद्धी देण्यासाठी मांडकी येथील रस्त्याची वस्तुस्थिती मांडली जाणार आहे….
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



