ताज्या बातम्या

माळशिरस तालुका व जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. मोहिनी सुहास देव यांची बिनविरोध निवड..

७१ वर्षांच्या न्यायालयीन इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान तोही बिनविरोध.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुका व जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व खजिनदार या पदासाठी सन 2024-25 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी ॲड. मोहिनी सुहास देव यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

त्याचबरोबर सचिव ॲड. श्री. साजिद शेख, सहसचिव ॲड. नाजनिन शेख, खजिनदार ॲड. राहुल लवटे पाटील ही पदे बिनविरोध झालेली आहेत‌. फक्त उपाध्यक्ष पदाची निवडणूक ॲड. राहुल लवटे पाटील व ॲड. पंकज फरतडे यांच्यामध्ये झालेली होती. त्यामध्ये ॲड. राहुल लवटे पाटील विजयी होऊन काल सर्वांनी पदभार स्वीकारला.

माळशिरस न्यायालयाच्या गेली ७१ वर्षांच्या कालावधीत प्रथमच अध्यक्ष म्हणून महिला वकील व ते पण बिनविरोध होण्याचा मान ॲड. सौ. मोहिनी सुहास देव यांनी मिळविला तर ॲड. राहुल लवटे पाटील यांनी बिनविरोध खजिनदार व निवडणुकीतून उपाध्यक्ष पद मिळविलेले आहे. त्यामुळे सर्वत्र नूतन पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत असून त्यांच्या पुढील कारकीर्दीला सर्व स्तरातून शुभेच्छा येत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
00:13