माळशिरस तालुक्यामध्ये पालख्यांच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासन सज्ज – नारायण शिरगांवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी

माळशिरस (बारामती झटका)
आषाढी वारी २०२५ निमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आळंदी येथुन दि. १९/०६/२०२५ रोजी प्रस्थान केले आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत धर्मपुरी बॉर्डर येथे दि. ३०/०६/२०२५ रोजी प्रवेश करीत आहे. तसेच हा सोहळा पुढे नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी ते पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. सदर सोहळ्यामध्ये ०७ ते ०८ लाख भाविक भक्त, दिंड्या व ०९ हजार वाहनांसह सहभागी असतात.
आषाढी वारी निमित्त संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहु, जि. पुणे येथुन दि. १८/०६/२०२५ रोजी पंढरपुरकडे प्रस्थान झाले आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत अकलुज येथे दि. ०१/०७/२०२५ रोजी प्रवेश करीत आहे. सदर सोहळ्यामध्ये ०३ ते ०४ लाख भाविकभक्त, दिंड्या व ५ हजार वाहनांसह सहभागी होत असतात.
श्री संत सोपानकाका पालखी सोहळा श्री क्षेत्र सासवड व श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोलापुर जिल्ह्यात प्रवेश करतात.
त्या अनुशंगाने खालीलप्रमाणे बंदोबस्त नेमण्याचे नियोजित करण्यात आले आहे –
अतिरिक्त पोलिस अधीक्षक – ०२, पोलीस उप अधिक्षक – ०६, पोनि – १७, सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर – ७५, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक पोलीस सब इन्स्पेक्टर – ०६, पोलीस कर्मचारी – ६४०, महिला पोलिस कर्मचारी – २००, ट्राफिक – ८०, गामा कमांडो – ३००, पुणे होमगार्ड – ४००, म. होम – १००, SRPF कंपनी – ०२, BDDS टिम – ०२
सुरक्षा उपययोजना :-
१) ड्रोन नियत्रंण – विनापरवाना ड्रोन उडवले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनर गन’ (Drone Jammer Gun) चा वापर करण्यात येणार आहे.
२) वाहतूक नियंत्रण – पालखी मार्गाचे ठिकाणी वाहतूक मार्ग बदल (डायव्हर्जन) करण्यात येणार आहे.
३) गर्दी व्यवस्थापन – पालखी रिंगन, विसावा व मुक्कामाचे ठिकाणी ठिकाणी बॅरिकेडिंग व्यवस्था करून पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.
४) महिला सुरक्षा – निर्भया पथक’ स्थापन करण्यात आले असून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला पोलीस पथके कार्यरत राहतील.
५) मुले, वृद्ध, महिलांची काळजी – गर्दीत हरवलेली व्यक्ती शोधण्यासाठी ‘मिसिंग सेल’ स्थापन केला जाणार असून, प्रत्येक मुक्कामी मदत केंद्राद्वारे सेवा दिली जाईल.
६) चोऱ्या व चोरीचा प्रयत्न रोखणे चोऱ्या व खिसेकापू टोळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘अँटीथेप्ट पथक’ नेमण्यात येणार आहे.

वाहतुक वळविणे व बंद करणे –
श्री संत ज्ञानेश्वर महाराज हि नातेपुते, माळशिरस, वेळापुर भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपुरकडे येत असते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलुज, श्रीपुर बोरगांव, तोंडलेबोंडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपुरकडे येत असते. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखो लोक सहभागी होणार असल्याने भावीक हे पायी पंढरपुरकडे येत असतात. पालखी बरोबर त्यांच्या दिंड्या व वाहने सोबत असतात. त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होवु नये म्हणुन पालखी सोहळ्यातील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने अकलुज व पंढरपुर या पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होवु नये म्हणुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविलेस कोंडी होणार नाही. त्याबाबत खालील मार्गाने वाहतुक वळविणे व बंद करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाचा रितसर आदेश लवकरच पारीत होत आहेत. फक्त दि. २९/०६/२०२५ ते दि. ०७/०७/२०२५ पर्यंतच पर्यायी मार्ग असणार आहे.
नातेपुते, माळशिरस, वेळापुर, पंढरपुर
चालु मार्ग – पंढरपुर-पुणे
पर्यायी मार्ग – वाखरी-साळमुख फाटा-पिलीव-म्हसवड-फलटण किंवा पंढरपुर-टेंभुर्णी-पुणे.
ग्रामीण, पंढरपुर श.
चालू मार्ग – पुणे-पंढरपुर
पर्यायी मार्ग – फलटण-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक-पंढरपुर किंवा पुणे-टेंभुर्णी-पंढरपुर
वेळापुर
चालू मार्ग – वेळापुर-पंढरपुर, सांगोला-पुणे
पर्यायी मार्ग – साळमुख चौक-सातारा रोड-पंढरपुर, वेळापुर-अकलुज-इंदापुर
अकलुज
चालू मार्ग – पुणे-इंदापुर-पंढरपुर, अकलुज-सोलापुर
पर्यायी मार्ग – टेंभुर्णी-पंढरपुर, टेंभुर्णी-सोलापुर.
चालू मार्ग – सोलापुर-अकलुज
पर्यायी मार्ग – टेंभुर्णी-अकलुज
आषाढी वारी सोहळा हा अतिशय देखणा व वारकरी सांप्रदाय यांनी शिस्तप्रिय व नियोजित बध्द परंपरा निर्माण केलेला सोहळा आहे. हा सोलापुर जिल्हा पोलीस प्रशासनाने परंपरेनुसार व नियोजन बध्द होण्याकरीता विशेष प्रयत्न केले असुन अपघात मुक्त वारी, निर्मलवारी, हरीत वारी, करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असुन प्रत्येक वारकरी भाविकांना एक शांत, सुव्यवस्थित आणि भावपूर्ण यात्रा अनुभवता यावी, म्हणुन आम्ही सर्व नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा करतो, असे श्री. नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग अकलुज यांनी आवाहन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



