चि. तुकाराम मुंगूसकर, तोंडले व चि. सौ. कां. उर्मिला चव्हाण, भोयरे यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

श्री. रामचंद्र मुंगूसकर, तोंडले आणि श्री. तात्यासाहेब चव्हाण, भोयरे यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार
तोंडले (बारामती झटका)
सौ. आधिका व श्री. रामचंद्र कोंडीबा मुंगूसकर रा. तोंडले, ता. माळशिरस, यांचे सुपुत्र चि. तुकाराम (B.Sc.) आणि सौ. वंदना व श्री. तात्यासाहेब मल्हारी चव्हाण रा. भोयरे, ता. मोहोळ, यांची कन्या चि. सौ. कां. उर्मिला (B.Tech) यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. २०/०६/२०२५ रोजी श्रीराम मंगल कार्यालय तोंडले, पंढरपूर-पुणे रोडवर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
मेहंदीच्या हाताने, हळदीच्या अंगाने, संगीताच्या साथीने, कुलदैवतेच्या साक्षीने, मातापित्यांच्या आशीर्वादाने, सप्तपदीच्या पवित्र बंधनाने, एकमेकांस आजन्म साथ देण्यास निघालेल्या चि. तुकाराम व चि. सौ. कां. उर्मिला या नवदांपत्यास आपले शुभाशीर्वाद मिळावेत. तरी या शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मेजर रणजीत मुंगूसकर यांनी केले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन, समस्त मुंगूसकर व चव्हाण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



