कृषिवार्ताताज्या बातम्या

माळशिरस तालुक्यात युरियाचा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांना अडचणीत दिलासा देणार… स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर

.एकीकडे खत विक्रेते लिंकिंग खते शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत तर दुसरीकडे काळ्या बाजाराने युरिया इंडस्ट्रीला जात आहे.

माळशिरस (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब, कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात युरियाचा काळाबाजार रोखून शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दिलासा देऊन खरीप हंगामातील पिके सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डौलाने पिके डौलतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना अजित भैया बोरकर म्हणाले, एकीकडे खत विक्रेते लिंकिंग खते शेतकऱ्यांच्या माती मारत आहेत तर दुसरीकडे काळ्या बाजाराने युरिया इंडस्ट्रीला जात आहे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे.

माळशिरस तालुक्यात गेले दोन तीन दिवस पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीस तयारीला लागला आहे. सध्या खरीप हंगामासाठी मका, बाजरी, तूर या पिकास पेरणीबरोबर खत द्यावे लागते. सध्या शेतकऱ्यांना मका, कडवळ या चारा पिकासाठी युरियाची अत्यंत गरज आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून युरियाचा काळाबाजार होऊन युरिया खताबरोबर इतर खते घेतली तरच युरिया खत मिळत आहे. खत विक्रेत्यांनी लिंकिंग खते शेतकऱ्यांच्या पदरात घालण्यास सुरुवात केली असून त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. यावर्षी प्रथमच रोहिणी व मृगाचा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकरी खरीप पेरणीच्या लगबगीत आहे. बी-बियाणे, खते घेण्याच्या तयारीत आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे बाजारात खते, बी-बियाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी रासायनिक खते विशेषतः युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना १०:२६:२६ किंवा १८:४६ सारखी महागडी किंवा आत्ता गरज नसलेली अशी खते लिंकिंगने घ्यावी लागत आहेत. त्याशिवाय एक दोन पोतीही युरिया मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

माळशिरस तालुक्यात नातेपुते, माळशिरस, पिलीव, अकलूज, वेळापूर अशा मोठ्या बाजारपेठा असूनही सगळीकडेच युरियाची मोठी टंचाई निर्माण झालेली दिसत आहे. सध्या पाऊस झाल्याने खरीप पेरणी बरोबरच मका, कडवळ अशी चारा पिके व उसाच्या खोडव्यासाठी शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत गरज असताना व्यापाऱ्यांकडून लिंकिंगची खते माथी मारली जात आहेत. निसर्गाने चांगली साथ दिलेली आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून युरियाचा काळाबाजार रोखून खत विक्रेत्यांची लिंकिंग यावर सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना लक्ष ठेवून असल्याचे मत आंदोलन अजितभैया बोरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

4 Comments

  1. buying prescription drugs in mexico online [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy[/url] mexico drug stores pharmacies

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort