माळशिरस तालुक्यातील लवंग गावच्या युवकांचा आदर्श नेते व कार्यकर्ते यांनी घ्यावा, असे सुसंस्कृत राजकीय विचार…

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील लवंग गावचे युवक श्री. प्रशांत पाटील, श्री. प्रदीप कदम व श्री. राहुल टिक पाटील यांचा नेते व कार्यकर्ते यांनी आदर्श घ्यावा, असे सुसंस्कृत राजकीय विचार पहावयास मिळत आहेत. याचे अनुकरण समाजातील सर्वांनी करावे.
लवंग, ता. माळशिरस या गावच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकमेकांचे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे कुस्ती क्षेत्रातील अतुट नाते असणाऱ्या दोस्तीत राजकीय कुस्ती लागलेली होती. श्री. प्रशांत पाटील, श्री. प्रदीप कदम व श्री. राहुल टिक पाटील थेट जनतेतील सरपंच पदासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले होते. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच म्हणून श्री. प्रशांत पाटील यांना जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले होते. राजकारणापुरतं राजकारण इतर वेळी समाजकारण अशा पद्धतीने जय पराजयाची तमा न बाळगता गावामध्ये विकासकामे व राजकीय सलोखा राखण्याचे काम सुरू आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी करीत असतात.

एकमुखी श्री दत्त मंदिर पायरी पूल तांबवे येथील श्री. आबासाहेब साळुंखे यांनी दत्त मंदिराची उभारणी केलेली आहे. सदरच्या ठिकाणी गुरुवारी व पौर्णिमेला आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गुरुवारी महाआरतीसाठी राजकारणातील एकमेकांच्या विरोधात उभा राहिलेले त्रिमूर्ती. तसं पाहिलं तर, त्रिमूर्ती म्हटलं की, दत्ताचा अवतार समजला जातो. मात्र, एक मुखी दत्ताच्या दर्शनासाठी तीन राजकीय मूर्तींनी एकत्र येऊन समाजाला वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.
खऱ्या अर्थाने समाजामध्ये अशाच पद्धतीने राजकारण होणे गरजेचे असते. परंतु, अनेक वेळा राजकारणातून वेगवेगळे प्रकार पहावयास मिळत असतात. समाजातील राजकारणी नेते व कार्यकर्ते यांनी लवंग गावच्या युवकांचा आदर्श घेऊन सुसंस्कृत राजकारण करावे, असाही संदेश लवंगच्या युवकांनी समाजाला दिलेला आहे. बारामती झटका वेब पोर्टल आणि न्यूज चॅनल यांनी निवडणुकीत तिघांच्याही मुलाखती घेतल्या होत्या. निवडणुकीनंतर तिघांचा एकत्रित फोटो टिपण्याचे काम देखील बारामती झटका यांनीच केले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.