माळशिरस तालुक्यातुन धम्म परिषदेला रिपाइंचे शेकडो कार्यकर्ते जाणार
श्रीपुर (बारामती झटका) रविराज बनसोडे यांजकडून
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्याच वेळी त्यांनी संकल्प केला होता की, पुढील धम्म दिक्षेचा कार्यक्रम हा १६ डिसेंबर १९५६ ला मुंबई येथील रेसकोर्स मैदानावर करायचा. परंतु, ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे मुंबईचा धम्म दीक्षा समारोह होऊ शकला नाही. डॉ. बाबासाहेबांचा हा संकल्प पुर्ण करण्यासाठी दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी रेसकोर्स मैदान, महालक्ष्मी, मुंबई याठिकाणी होणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील जागतिक बौद्ध धम्म परिषदेला बौद्ध धम्माचे जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा हे उद्घाटन व मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच बौद्ध धम्म परिषदेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदासजी आठवले साहेब हे असून राजयभरातुन लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच माळशिरस तालुक्यातुन रिपाइं आठवले पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. नंदकुमार केंगार साहेब, पश्चिम महाराष्ट्र संघटक युवराज वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे पाटील, जिल्हा संघटक व महाळुंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष धनाजी पवार व युवक तालुका अध्यक्ष रविराज बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातुन शेकडो कार्यकर्ते मुंबई येथील धम्म परिषदेला रवाना होणार आहेत. अशी माहिती रिपाइं युवक माळशिरस तालुका अध्यक्ष व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविराज बनसोडे यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.