ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची कायम “आठवण” पिलीवच्या “साठवण” तलावामुळे राहणार आहे.

पिलीवचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराशेजारील व जमदाडे लवण वस्ती शेजारी साठवण तलावात रूपांतर होणार, स्थानिक नागरिक व यात्रेकरूंना फायदा होणार

पिलीव (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कृपा आशीर्वादाने व सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पिलीव गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराशेजारी तलाव व जमदाडे लवण वस्ती शेजारील तलावाचे रूपांतर साठवण तलावात करून सदरच्या दोन्ही साठवण तलावासाठी अनुक्रमे 04 कोटी 85 लाख व 04 कोटी 70 लाख असे एकूण 09 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता मिळविलेली आहे. साठवण तलावामुळे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या वेळेस भाविक व यात्रेकरुंना कायम फायदा होणार आहे तर स्थानिक नागरिक यांचा शेतीचा व इतर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. त्यामुळे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची कायम “आठवण” पिलीवच्या “साठवण” तलावामुळे राहणार आहे.

पिलीव गावाचा बराचसा भाग घाटमाथ्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना कायम दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनसुद्धा पाणी वाहून जाते आणि ऐन उन्हाळ्यात पाण्याची अडचण भासत असते. यामुळे स्थानिक नागरिक व भाविकभक्त यांच्या मधून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे सातत्याने मागणी होती. सदरच्या तलावांचे रूपांतर साठवण तलावात होऊन तलावाची खोली दुरुस्ती आच्छादन केल्यास पावसाच्या पाण्याने तलाव भरून राहिल्यानंतर सदरच्या ठिकाणी पाण्याची कमतरता होणार नाही‌. साठवण तलावातील पाणी जमिनीत मुरल्यानंतर आसपासच्या भागातील विहिरी व विंधन विहिरी यांना परकुलेशनमुळे पाण्यात वाढ होणार आहे. शेतीला पूरक अशा पाण्याची आवश्यकता असते. पाणी नसल्याने सुपीक जमिनी नापीक झालेल्या आहेत‌. पाणी उपलब्ध झाल्यानंतर पिलीव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे.

श्री महालक्ष्मी देवीसाठी यात्रा व जत्रा करण्याकरता आलेल्या भाविकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. मोठ्या प्रमाणात जनावरांचा यात्रेत बाजार भरत असतो. जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी पाणी ऐन उन्हाळ्यात साठवन तलावात साठले जाणार आहे. यामुळे महालक्ष्मी देवीच्या भाविकभक्त व स्थानिक नागरिक यांच्यामधून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भरघोस असा दमदार निधी उपलब्ध केलेला असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button