क्रीडाताज्या बातम्या

मेडद येथे दीपावली महोत्सव निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन…

माळशिरस (बारामती झटका)

मेडद ता. माळशिरस, येथे सालाबादप्रमाणे दीपावली महोत्सवानिमित्त मंगळवार दि. 14/11/2023 रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन केलेले आहे. सदरच्या कुस्ती मैदानास दुपारी 03 वाजता मेडद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दीपावली महोत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ मिळत यांच्यावतीने निकाली कुस्त्यांचे जंगी आयोजन करण्यात आलेले आहे.

सदरच्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सतपाल सोनटक्के मेडद व पैलवान बाळू अपराध सांगली यांच्यामध्ये श्री. दादासाहेब जगताप व श्री. दत्ताभाऊ झंजे, श्री. पोमल तोरणे, श्री‌. अतुल तुपे यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान शुभम माने पुणे व पैलवान अमित जगदाळे कंदर यांच्यात लढत श्री. बाबासाहेब माने श्री. विजय तुपे, श्री. मोहन तुपे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंबई राजेंद्र कुंभार उद्योगपती श्री राजेंद्र काळे यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान तुषार झंजे मेडद व पैलवान विशाल राजगे सातारा यांच्यामध्ये माजी सरपंच श्री. युवराज झंजे, सरपंच श्री. दीपक लवटे, ॲड. श्री. आकाश पाटील, श्री. रोहिदास रणदिवे यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान बापू झंजे मेडद व पैलवान विजय वाघमोडे सातारा यांच्यामध्ये मंत्रालयीन सचिव श्री. विनायक लवटे, ॲड. राजाभाऊ वाघमोडे, श्री. शंकर काळे, श्री. प्रवीण सरगर यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान समाधान गोरड, पुणे व पैलवान भैय्या धुमाळ, कंदर यांच्यामध्ये गोरडवाडीचे माजी सरपंच श्री. भागवत कर्णवर माजी सरपंच श्री. विजय गोरड माजी चेअरमन श्री. खंडू तात्या कळसुले पवार यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान अविनाश झंजे मेडद व पैलवान सोनू भोसले शिवनेरी यांच्यामध्ये उद्योगपती श्री. काकासो काळे उद्योगपती श्री. चंद्रकांत लवटे पोलीस श्रीकृष्ण हंगे यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान विशाल काळे मेडद व पैलवान अण्णा वाघमोडे माळशिरस यांच्यामध्ये श्री. कांतीलाल हांगे उद्योजक पिंटूशेठ बंडगर श्री. दुर्गेश जमदाडे यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे.

पैलवान प्रसाद लवटे मेडद व पैलवान सचिन जरक शिवनेरी यांच्यामध्ये श्री. श्रीमंत सरतापे, श्री. अनिल देशमुख, श्री. दत्तू खरात, श्री. मोहन झंजे यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान दादा घुले शिवनेरी व पैलवान सोमनाथ गोरड पुणे यांच्यामध्ये उद्योगपती श्री. महादेव यमगर गोरडवाडीचे युवा सरपंच श्री. विष्णू भाऊ गोरड, श्री. विकास देशमुख यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान प्रज्योत माने मेडद व पैलवान यशराज मोरे शिवनेरी यांच्यामध्ये श्री‌. सचिन शिंगाडे, श्री. बाळू हांगे, श्री. उत्तम सोनटक्के, श्री. नाना नामदास यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान शिवतेज सिद मेडद व पैलवान आर्यन नरळे माळशिरस यांच्यामध्ये ॲड. दादासाहेब कोळेकर संचालक, श्री. संजय माने चेअरमन, श्री. संतोष गोरड यांच्या सहकार्याने कुस्ती होणार आहे. पैलवान पियुष काळे मेडद व पैलवान वीरेंद्र जाधव इंदापूर यांच्यामध्ये श्री. शिवाजी भाऊ लवटे युवा सेना माळशिरस, श्री. अशोक देशमुख, श्री‌. नाना शिवाजी जगताप यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान श्रावण शिंगाडे मेडद व पैलवान चंद्रहार पाटील फोंडशिरस यांच्यामध्ये श्री. श्रीमंत जगताप, श्री. सदाशिव झंजे पत्रकार, श्री. आबा भिसे यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे. पैलवान वेदांत लवटे मेडद व पैलवान हर्षद भांगे गारवाड यांच्यामध्ये व्यापारी श्री. राजू वाघमोडे, श्री. नाना काळे इंजिनिअर श्री. विनोद लवटे श्रीनाथ मेडिकल मेडद यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे.

सदरच्या कुस्ती मैदानाचे पैलवान युवराज केचे व पैलवान हनुमंत शेंडगे कुस्ती निवेदक असणार आहेत. तरी सर्व कुस्ती शौकीन, वस्ताद, पैलवान यांनी उपस्थित रहावे असे दीपावली महोत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ मेडद यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. सदरच्या कुस्ती मैदानाच्या अधिक माहितीसाठी पैलवान सचिन माने 9096109864 व पैलवान विकास तोरणे 7709095818 यांच्याशी संपर्क साधावा.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. I am no longer certain the place you are getting your info, but great topic. I needs to spend a while finding out more or figuring out more. Thanks for great information I used to be searching for this information for my mission.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button