ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा लोकप्रतिनिधी व जनता यांचा कृतज्ञता मेळावा…

सोलापूर लोकसभेसाठी भाजप व महायुतीकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच माळशिरस तालुक्यातील जनतेशी सुसंवाद साधणार आहेत.

माळशिरस (बारामती झटका)

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाविजय संयोजक प्रमुख श्रीकांतजी भारतीय, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यांनी भाजप व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच माळशिरस तालुक्यातील जनतेशी ते सुसंवाद साधणार आहेत. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी अनेकवेळा जनता दरबार घेतलेला आहे. मात्र, उद्या मंगळवार दि. २६/३/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मांडवे ५० फाटा, ता. माळशिरस येथील श्रीराम निवासस्थानी आमदार राम सातपुते यांचा लोकप्रतिनिधी व जनता यांचा कृतज्ञता मेळावा संपन्न होणार आहे.

माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनता यांच्या मनामध्ये आमदार राम सातपुते यांनी विकासाचे, जिव्हाळ्याचे, मैत्रीचे, आपुलकीचे, माणुसकीचे नाते निर्माण करून आपला माणूस अशी प्रतिमा तयार केलेली आहे. माळशिरस तालुक्यात राम सातपुते आमदार म्हणून लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कधीच त्यांनी आमदारकीची हवा डोक्यात शिरु दिली नाही. जनतेचा सेवक म्हणून जनतेची सेवा केली. महाराष्ट्रात असा कोणताच आमदार नसेल जो, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या फोनवरून अडचणी सोडवितात. अडचणीतील माणसाला मदत करणारा, आपल्याच परिवारातील सदस्य असावा अशा पद्धतीने वागणूक असल्याने प्रत्येक माणसाच्या घरामध्ये आपुलकीचे व स्नेहाचे नातं निर्माण केलेलं होतं.

समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा, धर्माचा, पार्टीचा हे न पाहता त्या व्यक्तीचे काम पाहिले. लगेचच कामाचा निपटारा केलेला असल्याने राम सातपुते यांचा कार्यामधून ताईत बनलेले अनेक कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार असताना गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवून आमदारकी पणाला लावलेली होती. एक वर्षासाठी सभागृहात निलंबन केलेले होते, तरीसुद्धा जनतेसाठी आमदार राम सातपुते कधीही मागे हटलेले नाहीत. अनेकवेळा रस्त्यावर विधानसभेत माळशिरस तहसील कार्यालयासमोर आंदोलने केलेली आहेत. जनतेच्या हितासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरलेले आहेत. भाजप व महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा माळशिरस तालुक्यात आणलेली आहे.

माळशिरस तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून माळशिरस तालुक्याच्या अनेक भागातील विकासापासून कोसो दूर असणारे विकासमय करून माळशिरस तालुक्यात रामराज्य निर्माण केलेले होते. माळशिरस तालुक्यात प्रथमच जनता दरबार शासकीय विश्राम गृह येथे सुरू केलेला होता. तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेने जनता दरबारामध्ये आपली कैफियत मांडून अनेक सार्वजनिक व व्यक्तिगत अडचणी सोडवून घेतलेले आहेत. आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक जाती धर्मातील लोकांची सर्व अवयवाची मोफत ऑपरेशन करून जनतेमधून आरोग्यदूत अशी पदवी प्राप्त झालेली आहे. सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील जनतेला वाटत होते. आमदार आपल्याच जनतेसाठी हवे आहेत. आमदार राम सातपुते यांनी कार्यातून आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली होती.

सोलापूरची लोकसभेची उमेदवारी कार्यकर्तृत्वामुळे मिळालेली आहे. पक्षाचा निर्णय लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मानून जनतेचे आजपर्यंत केलेले प्रेम जिव्हाळा व मैत्रीचं नातं यासाठी कृतज्ञता मेळावा आयोजित केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button