आरोग्यताज्या बातम्यासामाजिक
माळशिरस येथे पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
पतंजली योगपीठ हरिद्वार व शिवकमल योग निसर्गोपचार केंद्र यांच्यावतीने पतंजली, ओम शांती, हॅपी थॉट्स आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन श्री दत्त मंदिर, तलाठी कॉलनी, म्हसवड रोड, माळशिरस येथे करण्यात आले आहे.

या शिबिराचा कालावधी दि. ५ जानेवारी ते दिनांक ९ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. या शिबिराची वेळ पहाटे ५.३० ते ७ वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी योगशिक्षक निळकंठ शिवाजी वाघमोडे (मो. ७६६६८५८४९४) हे प्रशिक्षण देणार आहेत.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योग शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.