पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी राबविलेल्या योजनांची गावपातळीवर अंमलबजावणी करावी – महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ
सांगोला (बारामती झटका)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना कार्यरत केलेल्या आहेत. या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम गाव पातळीवरील भाजप महिला कार्यकर्त्यांनी करावे. पक्ष संघटनेत प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांनाच कार्यकारणीत संधी मिळेल. त्यामुळे पक्षासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवावी. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असताना भाजप महिला कार्यकर्त्यांनी प्रत्येक बस स्थानकात जावून महिला प्रवाशांचे स्वागत करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावेत अशा सूचना भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी दिल्या.
सांगोला भाजप महिला आघाडीच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना चित्रा वाघ बोलत होत्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पाटील, जिल्हा समन्वयक दिपाली व्हनमाने, लोकसभा समन्वय सुनंदा भगत, राजश्री नागणे, वैजयंती देशपांडे, संगीता चौगुले, ज्योती जाधव, सोनाली पाटील, लीना कदम, निता मगर पाटील, आशाताई लिगाडे, अर्चना बंडगर, रुपाली काळे, अर्चना रूपनर, अर्चना वलेकर, मनीषा आलदर, जयश्री जंगम, लतिका जाधव यांच्यासह भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This article had me hooked! For those curious, here’s more: DISCOVER MORE. What are your thoughts?