माण-खटाव ची दुष्काळी जनता चिमटे घेऊन पाहात आहे, आपण झोपेत आहोत की जागे आहोत..

उरमोडी जिहे कटापूर योजनेचे पाणी ढाकणी येथील नवीन बंधाऱ्यात दाखल…
खटाव (बारामती झटका)
माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे व दुष्काळी भागांच्या शेतकऱ्यांचे भगीरथ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या माण-खटाव मतदार संघातील कायम दुष्काळाच्या अनेक पिढ्या झळा सोसलेल्या दुष्काळी जनता चिमटे घेऊन पहात आहे, आपण झोपेत आहोत की जागे आहोत कारण, उरमोडी जिहे कटापूर योजनेचे पाणी माण-खटाव मतदार संघात अनेक गावांमध्ये पोचलेले आहे. त्यामध्ये ढाकणे येथे नवीन बंधारा बांधलेला आहे त्या बंधार्यात पाणी साठलेले असल्याने उन्हाळा आहे की पावसाळा, असा प्रश्न कायम दुष्काळ पाचवीला पुजलेल्या जनतेला व सर्व सामान्य शेतकऱ्यांना पडलेला आहे.

ऐन उन्हाळ्यात माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे दुष्काळाची झळा सोसत असतानाच गेल्या दोन महिन्यांपासून उरमोडी-जीहे कठापूर योजनेचे पाणी मतदारसंघात सुरू आहे. या योजनेअंतर्गत सुरू असलेले पाणी मानगंगा नदीत व मतदारसंघातील अनेक गावातील लहान मोठ्या तलावामध्ये सोडण्यात आले आहे.
ऐन उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर जनावरांचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न एप्रिल व मे महिन्यामध्ये सुटला आहे.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार उरमोडी योजनेचे पाणी ढाकणी, ता. माण येथील जयकुमार गोरे भाऊ यांच्या निधीतून नवीन पूर्ण झालेल्या बंधाऱ्यात सोडण्यात आले आहे.

पाणी साठलेले पाहून अनेक वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक आनंदाने म्हणत आहेत, याची देही याची डोळा देखीला सोहळा. लहान मुले आनंदाने पाण्यात पोहत आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.