जनसेवा रिक्षा संघटनेच्या वतीने लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अकलूज (बारामती झटका)
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा रिक्षा संघटना अकलूज शहर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जनसेवा रिक्षा संघटना अकलूज शहर यांच्या वतीने समाजबांधवांना महाप्रसाद वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. समाजसेवा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी आण्णासाहेब शिंदे, दिपक पिंजारे, चंद्रकांत गायकवाड, दादा नामदास, सागर देशमुख, विठ्ठल इंगळे आदी जनसेवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



