मांडवे गावचे गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचा तारणहार हरपला…

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच जयवंततात्या पालवे पाटील काळाच्या पडद्याआड..
मांडवे (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे सरपंच जयवंत मारुती पालवे पाटील यांचे मंगळवार दि. 22/04/2025 रोजी दुपारी अल्पशा आजाराने अकलूज येथील रुग्णालयात उपचार घेत असताना दुखद निधन झाले.
मांडवे गावच्या जडणघडणीत जयवंततात्या यांचा सिंहाचा वाटा आहे. मांडवे गावच्या सरपंच पदावर पंधरा वर्षे व उपसरपंच पदावर पाच वर्ष काम केलेले आहे. ते गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे तारणहार होते. चाळीस वर्ष राजकारणात सक्रिय व सकारात्मक राजकारण करून समाजामध्ये आपले वेगळे नाव केलेले होते. राजकारण करीत असताना कधीही सूडबुद्धीने राजकारण न करता राजकारणापुरते राजकारण करून समाजकार्यांमध्ये अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात पत्नी नागरबाई, दोन मुले नानासो व राजेंद्र, एक मुलगी संगीता बंडगर, भाऊ, भाऊजय, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे.

जयवंततात्या यांच्या दुःखद निधनाने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील गोरगरिबांचा आधारवड हरपलेला आहे. त्यांच्यावर आजच सायंकाळी 07 वाजता राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तात्यांच्या आत्म्यास शांती लाभो व पालवे पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.