मांडवे गावामध्ये दिवाळीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमात होणार परगावी आपल्या गावाचा नावलौकिक वाढवणाऱ्या गावकऱ्यांचा सन्मान
मांडवे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मांडवे गावातील युवकांनी एकत्रित येत दीपावली निमित्त दि. १५/११/२०२३ रोजी भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमानिमित्त आपल्या कामानिमित्त परगावी राहणाऱ्या व आपल्या गावचे नावलौकिक वाढवणाऱ्या सर्व मांडवेकरांचा सन्मान करण्याचं आयोजन या निमित्ताने केले आहे. कार्यक्रमाचे नावच ‘ग्रेट भेट दीपावली फेस्टिवल’ असं ठेवण्यात आले आहे. दीपावली सणानिमित्त सर्वांना सुट्टी असते व या सुट्टीमध्ये गावच्या मातीशी नातं जोडणारा हा कार्यक्रम हा निश्चित येणाऱ्या पिढींना एकोप्याचा संदेश देणारा ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी जात, धर्म, पंथ, राजकारण बाजूला ठेवून सहभागी होण्याचं आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक युवा पिढीने केले आहे.


या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बीड, लातूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातून डान्स ग्रुप येणार आहेत. तर या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा निखळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून दि. १२/११/२०२३ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर आपण करत असलेल्या कामाचा आपल्या गावाला अभिमान आहे. व आपण आपल्या गावाचे नावलौकिक असेच वाढवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. ही भावना गावातील परगावी राहणाऱ्या नोकरदार व्यवसायिकांची व्हावी व गावच्या मातीशी त्यांचं नातं घट्ट व्हावं म्हणून त्यांचा यथोचित असा सन्मान या निमित्ताने होणार आहे, असे मत कार्यक्रमाचे आयोजक यांनी व्यक्त केले.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.