ताज्या बातम्यासामाजिक

मांडवे येथे सौ. लता सुखदेव देवकाते यांचा आदर्श माता म्हणून सत्कार

मांडवे (बारामती झटका)

मांडवे ता. माळशिरस येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. लता सुखदेव देवकाते यांनी अतिशय बिकट परिस्थितीत आपल्या दोन मुलांना
अधिकारी बनविले, त्याबद्दल आज माळशिरस पंचायत समितीचे समाज कल्याण विस्तार अधिकारी सरवदे साहेब, कृषी विस्तार अधिकारी कोळेकर साहेब आणि मांडवे गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लता देवकाते मॅडम यांनी खूप खडतर प्रवास केला आहे. सदैव मनात, आपली मुलं अधिकारीच झाली पाहिजेत, असे स्वप्न उराशी बाळगले होते… ते स्वप्न त्यांनी आज पुर्ण केले.

त्यांचा मोठा मुलगा सागर सुखदेव देवकाते हा भुमी अभिलेख अधिकारी म्हणून शिरूर तालुक्यात कार्यरत आहे. तर दुसरा मुलगा निखिल सुखदेव देवकाते महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

या सत्कार समारंभावेळी सरपंच रितेश पालवे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव पालवे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव पालवे, पत्रकार दत्ताभाऊ ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बंडु सोनटक्के, बापुराव कोकरे, आनंद पालवे, गुणवंत ढोबळे, दत्ता गायकवाड, तानाजी कोळी, सुरेश गोरे, महादेव लांडगे, लांडगे मॅडम आदींसह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button