आमचे परममित्र व पत्रकार विष्णू भोंगळे बिचारा यांची मजबूरी आहे :-श्रीनिवास कदम पाटील.
पिपाण्या, तुताऱ्या, भोंगे याकडे वाचक प्रेक्षक हितचिंतक व मित्रपरिवार यांनी लक्ष देऊ नये, बारामती झटका युट्युब वर असणारा शिंगाडा चा आवाज निकालानंतर ऐका वेट अँड वॉच…
सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत सदस्य आमचे परममित्र व पत्रकार बांधव विष्णू भोंगळे यांनी व्हाट्सअप ग्रुप वर नाना पाटेकर यांचा व्हिडिओ व्हायरल करून बारामती झटका यांच्या प्रतिक्रिया असे पाठवलेले आहे त्याबद्दल बिचाऱ्याचा काहीही दोष नाही मित्राची मजबुरी आहे सध्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे सत्ताधारी गटाला विरोधकाने मोठे आव्हान उभे केलेले आहे परिवर्तनाची नांदी आहे त्यामुळे पायाखालची वाळू सरकणारच निवडणुकीत पिपाण्या तुताऱ्या भोंगे मालकांनी फुंकल तसे आवाज देणारच त्यांचा दोष नाही अशा गोष्टीकडे हितचिंतक व मित्रपरिवार यांनी लक्ष देऊ नये बारामती झटका यूट्यूब वर असणारा शिंगाडाचा आवाज निकालानंतर ऐका वेट अँड वॉच संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचे कडून सर्वांना नम्र विनंती आहे कोणीही कोणत्याही प्रकारे विष्णू भोंगळे व कोणालाच उलट सुलट प्रतिक्रिया देऊ नये अशी आपणास बारामती झटका परिवार यांचे कडून नम्र व कळकळीची विनंती आहे. कारण सत्ताधारी गटाला बारामती झटका दखलपात्र झालेला आहे. विष्णू भोंगळे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचे चांगले मैत्रीचे नाते आहे भविष्यात सुद्धा असेच नाते टिकून राहणार श्रीमती सत्यभामा भोंगळे यांना श्रीनिवास कदम पाटील मावशी म्हणत आहेत घरगुती सुद्धा संबंध आहेत बिचाऱ्याचा ना इलाज आहे.
बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल यांनी समाज माध्यमाचे काम करीत असताना सर्वसामान्य जनता व जनतेच्या अडीअडचणी अशा बातम्या तयार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले आहे जनतेच्या मनावर अधिराज्य केलेले आहे. बारामती झटका वेब पोर्टल वाचकांची संख्या एक कोटी 75 लाखाच्या वर झालेली आहे. बारामती झटका यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची 90 लाखाच्या वर संख्या गेलेली आहे. थेट सबस्क्राईब म्हणजेच सभासद 42 हजाराच्या वर आहेत. 14 वर्ष पत्रकारिता संपादक श्रीनिवास कदम पाटील करीत आहेत त्यामुळे पत्रकारितेचा 14 वर्षाचा वनवास संपणार आहे . अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे जनतेसमोर प्रसार माध्यमांचे काम करीत असताना विष्णू भाऊ सारख्या अनेक पिपाण्या, तुताऱ्या, भोंगे यांच्यामधून कर्कश आवाज येणार आहे सदरचा आवाज निकालानंतर बंद होणार आहे तरी सर्व वाचक प्रेक्षक हितचिंतक व मित्रपरिवार यांनी मनाला न लावून घेता आनंदाने वाचा ऐका व नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे म्हणून आनंदात राहावे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा.https://bit.ly/31IKDng