रवींद्र पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) सोलापूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

सोलापूर (बारामती झटका)
श्री. रवींद्र शहाजीराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) सोलापूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.


सदर नियुक्ती पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षासाठी सोलापूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी योगदान द्याल, असा मला ठाम विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. अशी अपेक्षा सदर नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.


सदर नियुक्ती बद्दल रवींद्र पाटील यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.